अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जण गंभीर जखमी, माऊली ॲम्बुलन्स च्या वतीने तात्काळ मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला

अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जण गंभीर जखमी

माऊली ॲम्बुलन्स च्या वतीने तात्काळ मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला

अहिल्यानगर: 

पाथर्डी तालुक्यातील आडगाव ते महालक्ष्मी हिवरे या  कालव्याच्या कडेने असलेल्या रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

काकासाहेब साहेबराव बर्फे (वय ५० वर्षे, रा.आडगाव, ता.पाथर्डी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच मिरी येथील माऊली ॲम्बुलन्स सर्विसेसचे संचालक ज्ञानेश्वर दाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला ॲम्बुलन्स द्वारे नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या जखमीची प्रकृती व्यवस्थित असून तात्काळ मदत केल्याबद्दल दाणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें