अक्षय कर्डिलेंच्या प्रचारार्थ झालेल्या मिरीतील मेळाव्यात सुजय विखेंची थेट शरद पवारांवर टीका

राहुरी पोटनिवडणुकीत विखे-पवार संघर्ष पुन्हा पेटला

अक्षय कर्डिलेंच्या प्रचारार्थ झालेल्या मिरीतील मेळाव्यात सुजय विखेंची थेट टीका

सचिन नन्नवरे

अहिल्यानगर: राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार तथा जिल्हा बँकेचे संचालक अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ मिरी येथे भाजप कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पार पडला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

विखे-पवार संघर्ष पुन्हा चर्चेत

मेळाव्यात बोलताना सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर थेट टीका करत नगर जिल्ह्याच्या विकासाबाबत पवारांनी अन्याय केल्याचा आरोप केला. बारामतीतील पोटनिवडणुकीत सहानुभूती दाखवणाऱ्या पवारांनी राहुरीसाठी तीच भूमिका का घेतली नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याबाबत पवारांनी वेगळा न्याय केला, अशी टीका करत त्यांनी पवारांच्या मनात राजकीय द्वेषभावना असल्याचे म्हटले.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व कुटुंबाचे विखेंकडून कौतुक

विखे यांनी आपल्या भाषणात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे विशेष कौतुक केले. निवडणुकीतून माघार घेत सहानुभूती दाखवून त्यांनी सुसंस्कृत राजकारणाचे उदाहरण घातले, असे सांगत भाजपच्या वतीने त्यांचे आभार मानले. तसेच कार्यकर्त्यांनी तनपुरे समर्थकांकडे जाऊन मते मागावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा पराभवावर विखेंचे भाष्य

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य व्यक्त करत विखे म्हणाले की, विकासकामे करूनही ती जनतेपर्यंत पोहोचवण्यात कार्यकर्ते कमी पडले. त्यामुळे पराभव पत्करावा लागला. परंतु विद्यमान खासदारावर टीका करत त्यांनी “दिखाऊपणा करणारा खासदार लोकांना हवा होता” असा टोला विखेंनी लगावला.

बिनविरोध निवडणुकीवर स्पष्टीकरण

राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आल्याच्या टीकेवर उत्तर देताना विखे म्हणाले की, एवढा मोठा पवार घराणा असताना देखील त्या ठिकाणी २२ उमेदवार रिंगणात असून मतदानासाठी दोन मशीन लागणार आहेत, त्या तुलनेने राहुरी मतदार संघातील २३ उमेदवारांपैकी अनेक उमेदवारांना माघार घ्यायला लावून फक्त सात उमेदवार रिंगणात ठेवले, ही बाबही टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावी.

विकासाचा अजेंडा: मुळा धरण व वांबोरी चारी

विखे यांनी पुढील काळात मुळा धरणाची उंची वाढवणे व गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. त्यामुळे अतिरिक्त पाणी साठा निर्माण होऊन वांबोरी चारीच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच वंचित गावांसाठी टप्पा एक व दोन प्रमाणे पुढे वांबोरी चारी टप्पा तीन देखील राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इशारा

विखे यांनी वांबोरी चारी “टप्पा एक, दोन, तीन” या सूत्राचा उल्लेख करत टप्प्याटप्प्याने विधानसभा, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विरोधकांचा हिशोब केला जाईल, असा अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यानुसार टप्पा एक मध्ये जिल्ह्यातील मोठ्या मोठ्यांना पराभूत करून टप्पा एक पार पडला असून, पुढील काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये टप्पा दोन व तीन राबवला जाईल असा इशारा विरोधकांना दिला आहे.

निवडणूक सोपी वाटत असली तरी गाफील न राहण्याचे आवाहन

ही निवडणूक सोपी वाटत असली तरी गाफील राहू नका. अक्षय कर्डिले यांना राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहन विखे यांनी कार्यकर्त्यांना केले.

माशाला पाण्यात पोहायला शिकवावे लागत नाही – आमदार राजळे

आमदार मोनिकाताई राजळे यांनी आपल्या भाषणात अक्षय कर्डिले यांचे कौतुक करत जन्मापासून शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या माध्यमातून राजकारण व समाजकारणाचे धडे  अक्षय कर्डिले यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे जसे “माशाला पोहायला शिकवावे लागत नाही तसेच अक्षय कर्डिले हे नवखे उमेदवार नसून त्यांना राजकारणाची पूर्ण शिकवण घरातूनच मिळाली आहे,” असे सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने पोट निवडणुकीत काम करावे, असे आवाहन आमदार राजळे यांनी केले.

मेळाव्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

या मेळाव्यास भाजपचे नेते दीपक शेठ लांडगे, मंडळाध्यक्ष संतोष शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैभवराव खलाटे, खरेदी-विक्री संघाचे संचालक पोपटराव कराळे, कारखान्याचे संचालक चारुदत्त वाघ, डॉ. यशवंत गवळी, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कोरडे, डॉ. बबनराव नरसाळे, युवा नेते कुशलदादा भापसे, डॉ. नंदकिशोर नरसाळे, ज्येष्ठ नेते कारभारी गवळी, राजूमामा तागड, महादेव कुटे पाटील, संभाजी वाघ, बापू घोरपडे, अण्णा पाटील शिंदे, सुभाष गवळी, शिवाजी वेताळ मेजर, विजय कुटे, सरपंच शंकर शिरसाठ, संदीप देशमुख, गौतम कराळे, गोपीनाथ म्हस्के, प्रशांत गवळी, संभाजी झाडे, श्रीराम गवळी, एकनाथ झाडे, जालिंदर गवळी, विजय गुंड, संभाजी दारकुंडे, महिला नेत्या विजया सोलाट, शोभा तुपे यांच्यासह मिरी परिसरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें