मिरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मिरी (ता. पाथर्डी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे मंडळाध्यक्ष संतोष शिंदे, पत्रकार सचिन नन्नवरे, युवा उद्योजक अनिल कानडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिरपगार, सतीश मिरपगार, सोमनाथ मिरपगार, प्रमोद मिरपगार, सचिन मिरपगार, योगेश मिरपगार, आकाश मिरपगार, अक्षय मिरपगार, विशाल मिरपगार, प्रविण मिरपगार तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.







