अभिमानाचा सुवर्णक्षण… गौरवाचा प्रेरणादायी क्षण

राहुरी: किशोर बाचकर
चंद्रगिरी माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालय, मांजरी येथील होतकरू विद्यार्थिनी कु. कीर्ती भागवत जाधव यांना नुकतेच जागृतीज फाउंडेशन, नाशिक यांच्यातर्फे “आदर्श महिला पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ही केवळ कीर्तीचीच नव्हे, तर संपूर्ण विद्यालयासाठी अभिमानाची शाल, यशाची पताका आणि प्रेरणेची ज्योत ठरली आहे. विद्यालयातर्फे त्यांचा सन्मान करताना विद्यालयाचे प्राचार्य श्री रामदास गोडे सर तसेच सर्व मान्यवर शिक्षकवृंद.
उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. मेहनतीच्या पाऊलखुणांवर यशाची फुले उमलतात,
आणि कर्तृत्वाच्या तेजाने व्यक्तिमत्त्व उजळून निघते कु. कीर्ती जाधव यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!







