मिरीत कर्डिले यांची जोरदार प्रचारफेरी; कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती, विजयाच्या चर्चांना उधाण

मिरीत कर्डिले यांची जोरदार प्रचारफेरी; कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती, विजयाच्या चर्चांना उधाण

सचिन नन्नवरे 

मिरीत प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे शनिवारी दुपारी भव्य प्रचारफेरी पार पडली. या प्रचारफेरीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तनपुरे गटातील कार्यकर्त्यांची भाजपकडे आगेकूच

या रॅलीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी तनपुरे गटाशी संबंधित असलेले अनेक कार्यकर्ते भाजपचे पट्टे परिधान करून सक्रियपणे कर्डिलेंच्या प्रचारफेरीत सहभागी झाले. यामुळे राजकीय वातावरणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

युवक, ज्येष्ठ पदाधिकारी, व्यापारी, शेतकरी तसेच विविध गावांतील स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. मिरी परिसरात या प्रचारफेरीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून आले.

चौकसभेत कर्डिले यांचे भावनिक आवाहन

प्रचारफेरीदरम्यान आयोजित चौकसभेत बोलताना अक्षय कर्डिले यांनी मतदारांना भावनिक साद घातली. “ही माझ्या आयुष्यातील पहिली आणि कर्डिले साहेबांशिवाय होणारी महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळे शेवटचे चार दिवस मला द्या, माझे संपूर्ण आयुष्य मी तुमच्यासाठी समर्पित करीन,” असे त्यांनी सांगितले.

मिरी पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी आपली भावना व्यक्त करत कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा विश्वास दिला. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

कर्डिले यांनी आठवडे बाजारात जाऊन शेतकरी व व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत मतदानाचे आवाहन करत आपुलकीचा स्पर्श दिला.

प्रचारफेरीतील मोठी गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता कर्डिले यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे इतर उमेदवारांविषयी मिरी पंचक्रोशीमध्ये विशेष चर्चा ऐकू येत नसल्याने कर्डिले यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.

मिरी परिसरातून मोठ्या मताधिक्याची शक्यता

एकंदरीत वातावरण पाहता मिरी परिसरातून अक्षय कर्डिले यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें