राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्राजक्त तनपुरेंची भूमिका जाहीर

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्राजक्त तनपुरेंची भूमिका जाहीर

“स्थानिक पातळीवर ठरवा” – तनपुरे यांच्या भूमिकेने समीकरणे गुंतागुंतीची

सचिन नन्नवरे
राहुरी: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु निवडणूक काळात कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केली नव्हती.
     २० तारखेला कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करू कसे तनपुरे यांनी सांगितले होते. त्यानुसार तनपुरे यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी सायंकाळी आपली अधिकृत भूमिका एका पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
      या पत्रकात तनपुरे यांनी कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला स्पष्ट पाठिंबा न दर्शविल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच गोंधळाचे बनले आहे.
    तनपुरे यांनी आपल्या निवेदनात स्थानिक परिस्थितीचा विचार करून तसेच सर्व घटकांशी चर्चा करून पुढील दिशा निश्चित केल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्यांनी भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट) किंवा अन्य अपक्ष उमेदवाराला मतदान करावे, अशी कोणतीही ठोस भूमिका मांडलेली नाही. उलट, स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपापली भूमिका ठरवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
    या पार्श्वभूमीवर तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय राहणार, यावरच निवडणुकीचे बरेचसे गणित अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे गोविंद मोकाटे व अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्या समर्थकांकडून तनपुरे यांचा आपल्यालाच जाहीर पाठिंबा असल्याचे स्टेटस व संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मात्र, या संदर्भात कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन स्वतः तनपुरे यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
दरम्यान, तनपुरे यांनी निर्णयाची जबाबदारी स्थानिक पातळीवर सोपविल्याने कार्यकर्ते कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या निर्णयाचा थेट परिणाम राहुरी पोटनिवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें