विधी परीक्षा अर्जातील तांत्रिक गोंधळ उघड

विधी परीक्षा अर्जातील तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांची धावपळ

विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यापीठाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर पोर्टल सुरळीत

अहिल्यानगर:   अहिल्यानगर येथील न्यू लॉ कॉलेजच्या यिन चे अध्यक्ष महेश शिवाजीराव मचे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून  महाविद्यालयातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी अखेर दूर करण्यात यश आले आहे. विद्यार्थी प्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत पोर्टलवर एलएलबी (LLB) व बी.एलएलबी (B.LLB) विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना, अर्जाची प्रिंट काढताना तसेच ऑनलाईन शुल्क भरताना वारंवार सर्व्हर एरर व तांत्रिक त्रुटींचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा प्रयत्न करूनही अर्ज सबमिट होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर महेश मचे (एलएलबी),   हमेरा अजाज अहमद  अन्सारी (बी.ए.एलएलबी) तसेच मुख्य सल्लागार  मस्तान कुरेशी आणि समन्वयक  ज्ञानेश्वर कर्डिले यांनी विशेष पुढाकार घेतला. या पथकाने विद्यापीठाच्या तांत्रिक विभागाशी संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या वतीने अधिकृत ई-मेलद्वारे तक्रार नोंदवली तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून समस्या मांडली.

विद्यार्थ्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर सिस्टीममधील तांत्रिक दोष दूर करण्यात आले असून, परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज सादर करता येणार असून, संभाव्य शैक्षणिक नुकसान टळले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी तत्पर राहून मोलाचे सहकार्य करणाऱ्या  विशाखा जाधव,  अनन्या काळे आणि  राजलक्ष्मी पालवे या संघटकांचे महाविद्यालयीन स्तरावर विशेष कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांच्या या एकजुटीमुळे आणि प्रतिनिधींच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागली असून, भविष्यात अशा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें