शिराळ (चिचोंडी) येथे प्रथमच भव्य कुस्ती मैदान, मानाची ५१ हजारांची कुस्ती

शिराळ (चिचोंडी) येथे प्रथमच भव्य कुस्ती मैदान

मानाची ५१ हजारांची कुस्ती ठरली बरोबरीत

प्रतिनिधी : दिपक खोमणे,  89753 26147

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील शिराळ (चिचोंडी) येथील जागृत देवस्थान असलेल्या ग्रामदैवत श्री दुर्गा देवी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त इतिहासात पहिल्यांदाच भव्य स्वरूपाच्या कुस्ती मैदानाचे आयोजन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले होते. या कुस्ती हंगाम्यात नामवंत मल्लांनी सहभागी होत अतिशय जोशपूर्ण कुस्त्या सादर केल्या. रात्री सुमारे दहा वाजेपर्यंत चाललेल्या या कुस्ती आखाड्यात सहभागी मल्लांना ग्रामस्थ व यात्रा समितीच्या वतीने रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कुस्ती मैदानात परिसरातील कुस्ती शौकिनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मानाची ५१ हजारांची कुस्ती बरोबरीत

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भाजप नेते वैभवराव खलाटे व सचिन वाघ यांच्या वतीने स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मरणार्थ ५१ हजार रुपयांची मानाची कुस्ती लावण्यात आली होती. या कुस्तीसाठी दोन्ही मल्लांनी बराच वेळ कडवी झुंज दिल्याने अखेर कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली व दोन्ही मल्लांना बक्षिसाची रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सदर कुस्ती मैदानात पंच म्हणून शिराळ येथील नामवंत कुस्ती प्रशिक्षक पै. मिठू मुळे, अरुण गोरे, अमोल वांढेकर यांनी काम पाहिले, तर नामवंत निवेदक प्राध्यापक अशोक गाडे यांनी आपल्या खास शैलीत समालोचन करून वातावरण उत्साही ठेवले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी कुसळकर, भगवान टकले तसेच अक्षय लबडे यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यात्रा उत्सव व कुस्ती हंगामा सुरळीत पार पाडण्यासाठी वैभवराव खलाटे, रामदास गोरे, शरद मुळे, शशी मुळे, भाऊसाहेब मुळे, कुंडलिक गोरे, भाऊसाहेब गोरे, गणेश गोरे, भाऊ आव्हाड, दत्तू मुळे, हनुमंत घोरपडे, शिवाजी घोरपडे, बाळू दारकुंडे, सचिन वाघ, सोमनाथ मुळे, पिनु दारकुंडे, अनिल कराळे, महादेव कराळे, अशोक गोरे, संभाजी गोरे, रवी कराळे, प्रल्हाद वाघ, गोरख तागड, दिलीप गुगळे, चांगदेव तुपे, वाल्मीक घोरपडे, जयदीप तुपे, किसन दारकुंडे, अशोक आव्हाड, संदीप नजन, दत्तू चव्हाण, शिवाजी बोरुडे, दत्ता झाडे, प्रकाश घोरपडे आदींनी परिश्रम घेतले.

पुढील वर्षी याहीपेक्षा अधिक मोठ्या स्वरूपात कुस्ती मैदान भरविण्यात येईल, असा विश्वास यात्रा कमिटीच्या वतीने वैभवराव खलाटे यांनी व्यक्त केला.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें