मिरी येथे देवीच्या ज्योतीची भक्तिमय वातावरणात मिरवणूक


मिरी येथे देवीच्या ज्योतीची भक्तिमय वातावरणात मिरवणूक

विधीवत घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ

सचिन नन्नवरे 

मिरी, पाथर्डी : मिरी येथील मोहोज रोडवरील वडाचा माथा (कोरडे वस्ती) परिसरातील श्री मळंगंगा देवी मंदिरात रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. माहूरगडावरून आणलेल्या देवीच्या पवित्र ज्योतीची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ज्योतीचे विधिवत पूजन करून घटस्थापना करण्यात आली. मिरवणुकीत कोरडे वस्ती, झाडे वस्ती व मिरी गावातील भाविक सहभागी झाले होते. या ज्योतीचे विविध ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.

कोरडे वस्ती येथे गेल्या अनेक वर्षांपासून सामूहिक सहभागातून नवरात्रोत्सवाची परंपरा जपली जात आहे. दरवर्षी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवरून देवीची ज्योत आणली जाते. यंदा माहूरगडावरून ज्योत आणण्यासाठी कोरडे वस्ती, झाडे वस्ती व मिरी गावातील सुमारे ५० ते ६० भाविक गेले होते. या ज्योतीच्या आगमनाने परिसरातील उत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

दि. ११ ते १९ ऑक्टोबर या नऊ दिवसांच्या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे ५ ते ६ काकडा भजन, सकाळी महाआरती, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि सायंकाळी ६.३० ते ७.३० महाआरती होणार आहे. रात्री ७ ते ९ या वेळेत श्रीमददेवी भागवत कथा व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्थानिक भजनी मंडळे व वारकरी भाविकांचाही कार्यक्रमांत सहभाग राहणार आहे.

संत वेणुनाथ महाराज वारकरी गुरुकुल, मिरी येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भिसे यांच्या वाणीतून श्रीमद देवी भागवत कथा होत आहे. उत्सवातील धार्मिक कार्यक्रमांत ह.भ.प. सोमनाथ महाराज गडाख, ह.भ.प. सुभाष महाराज राऊत, ह.भ.प. भागवत महाराज वेताळ, ह.भ.प. महेश महाराज तागड व ह.भ.प. बद्रीनाथ महाराज नवल यांच्यासह विविध मान्यवर महाराज सहभागी होणार आहेत.

उत्सवाची सांगता सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) होणार असून, सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प.जगन्नाथ महाराज गवळी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

या उत्सवासाठी श्री राम कोरडे सर व जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष विजयकुमार कोरडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे. आयोजनासाठी डॉ. शाम कोरडे, भाऊसाहेब काळे, बापू कोरडे, महेश कोरडे, अशोक कोरडे, अनिल कोरडे, बालम गवळी, बाळासाहेब कोरडे, जनार्दन कोरडे, ज्ञानदेव नन्नवरे, श्रीकांत कोरडे, आकाश कोरडे, ऋषिकेश कोरडे, संतोष कोरडे, कैलास कोरडे, हरी कोरडे, कार्तिक कोरडे, दीपक कोरडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व भाविक परिश्रम घेत आहेत.

परिसरातील भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन भजन, कीर्तन, श्रीमद देवी भागवत कथा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मळंगंगा देवी मंदिर उत्सव समिती व समस्त ग्रामस्थ, कोरडे वस्ती, मिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दरवर्षी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावरून आणली जाते देवीची ज्योत

कोरडे वस्तीच्या नवरात्रोत्सवात दरवर्षी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवरून देवीची पवित्र ज्योत आणण्याची परंपरा आहे. यंदा माहूरगडावरून ज्योत आणण्यासाठी कोरडे वस्ती, झाडे वस्ती व मिरी गावातील सुमारे ५० ते ६० भाविक सहभागी झाले होते. रविवारी ज्योतीची मिरवणूक, पूजन व घटस्थापना करून नऊ दिवसांच्या धार्मिक उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें