राहुरी शहरात डिजिटल जनगणना मोहीम वेगात; ७० प्रगणक-पर्यवेक्षकांची नियुक्ती

राहुरी शहरात डिजिटल जनगणना मोहीम वेगात; ७० प्रगणक-पर्यवेक्षकांची नियुक्ती

दुसऱ्या बॅचच्या प्रशिक्षणाला सुरुवात; 12 प्रभागांतील प्रत्येक घरापर्यंत माहिती संकलन

सचिन नन्नवरे 

राहुरी : राहुरी शहरात जनगणना मोहिमेला वेग आला असून नगरपरिषद हद्दीतील जनगणनेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या मोहिमेसाठी एकूण ७० प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून सध्या बॅच क्रमांक 2 चा दुसऱ्या दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे.

यंदाची जनगणना ही पारंपरिक कागद-पेन पद्धतीऐवजी पूर्णपणे डिजिटल माध्यमातून होणार असल्याने माहिती अधिक अचूक आणि जलदगतीने संकलित होणार आहे. या संदर्भातील प्रशिक्षण दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आले आहे. पहिली बॅच 26 ते 28 एप्रिल 2026 दरम्यान पार पडली असून दुसरी बॅच 4 ते 6 मे 2026 या कालावधीत सुरू आहे. हे प्रशिक्षण राहुरी नगरपरिषदेच्या डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृहात होत असल्याची माहिती चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी दिली.

शहरातील एकूण 12 प्रभागांची जबाबदारी प्रगणकांवर सोपविण्यात आली असून ते घराघरांत जाऊन माहिती संकलित करणार आहेत. या मोहिमेबाबत नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, माजी खासदार बापूसाहेब तनपुरे, गटनेते हर्ष तनपुरे, उपाध्यक्ष गजानन सातभाई, विरोधी पक्षनेते अरुण साळवे तसेच नगरसेवक बबनराव गुलदगड यांनी मार्गदर्शन करत विविध सूचना दिल्या.

जनगणनेदरम्यान नागरिकांसाठी स्वयं-गणना करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिक ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वतःची माहिती स्वतः भरू शकतात. यामुळे प्रगणकांचा वेळ वाचून काम अधिक सुलभ होणार आहे. प्रशासनाने नागरिकांना दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय ठेवली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

प्रगणक जेव्हा घरी भेट देतील, तेव्हा त्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्र असेल. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या मोहिमेत चार्ज अधिकारी अभिजीत हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी शंकर आगलावे व स्वप्निल हारेल (तांत्रिक) कार्यरत आहेत. तसेच फील्ड ट्रेनर म्हणून गायकवाड सर, मोरे सर, खैरनार सर व गिरी सर हे प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देत आहेत.

या प्रशिक्षणासाठी राहुरी कॉलेज, प्रगती विद्यालय, विद्यामंदिर प्रशाला, भागीरथी शाळा तसेच राहुरी नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी यांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात अनुपस्थित राहिलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे राहुरी शहरवासीयांना आवाहन

आगामी जनगणना मोहिमेच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी शहरवासियांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. नागरिकांनी स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवत प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

“जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया असून प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे ही आपली जबाबदारी आहे. स्वयं-गणना सुविधेचा लाभ घेत नागरिकांनी स्वतःहून माहिती भरावी, त्यामुळे प्रशासनाचे काम सुलभ होईल,” असे तनपुरे यांनी नमूद केले.

तसेच, प्रगणक घरोघरी भेट देणार असल्याने नागरिकांनी त्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे व या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें