मिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सवाद्य मिरवणुकीतून उत्स्फूर्त सहभाग

मिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सवाद्य मिरवणुकीतून उत्स्फूर्त सहभाग

मिरी (ता. पाथर्डी) : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे भिमरत्न प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली , या मिरवणुकीत भीम अनुयायांसह ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात मिरी येथील सेवा सोसायटीचे तज्ञ संचालक राजेंद्र नेते गवळी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जयभीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. युवकांनी निळे झेंडे हातात घेऊन मिरवणुकीत उत्साहाने सहभाग नोंदवला. महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.

या कार्यक्रमास राजेंद्र नेते गवळी, रिपब्लिकन सेनेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष विकास गजभिव, प्राचार्य भाऊसाहेब बर्फे सर, जनार्दन मिरपगार, रामदास दाणे, रमेश औताडे, बाळा औताडे, अनिल मिरपगार, सुनील मिरपगार, नितीन मिरपगार, सुनील औताडे, तेजस औताडे, संकेत गवळी, अरमान शेख, गोरक्षनाथ गवळी, कोरडे सर, अमोल वाघमारे, अभिषेक औताडे, सार्थक मिरपगार, दीपक मिरपगार, राजू औताडे, दीपक हताळे, यश पाटोळे, वैभव गवळी, जॉन औताडे, बंटी अल्हाट, नवनाथ घोरपडे, प्रफुल्ल मिरपगार आदींसह भीम अनुयायी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंतीनिमित्त विविध ठिकाणी सामाजिक संदेश देण्यात आले. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करून समाजात समता, बंधुता आणि न्याय यांची जाणीव निर्माण करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें