मोहटादेवीगड येथे प्रभुश्रीरामचंद्र जन्मोत्सवास व वासंतीक नवरात्रोत्सव
विश्वस्त दहिफळे व देशमुख यांच्या हस्ते होमवहन संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे वासंतीक नवरात्र महोत्सव सांगता देवस्थानचे विश्वस्त श्री शशिकांत दहिफळे, डॉ. श्रीधर देशमुख यांचे हस्ते होमवहनाचा कार्यक्रम व प्रभूरामचंद्र जन्मोत्सवासह वासंतीक नवरात्राची सांगता झाली.
वासंतीक नवरात्र महोत्सवामध्ये शांतीपाठ, महासंकल्प, पुण्याहवाचन, चंडीयाग हवन, चौसष्ठ योगीनी दशमहाविद्या, अष्टभैरव इ. देवदेतांसह, अभिषेकासह षोडशोपचार विधीयुक्त पुजन केले.सकल भारतवासीय देवीभक्तांचे उत्तम आरोग्य व धनधान्य, सुख समृध्दी प्राप्त व्हावी असा महासंकल्प करुन प्रार्थना करण्यात आली.
होमहवन कार्यक्रमास व प्रभुश्रीरामचंद्र जन्मोत्सवास गुरुदेव महर्षि योगी उत्तम स्वामी महाराज, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे धर्मजागरण प्रमुख श्रीनिवास पुल्लया, देवस्थानचे विश्वस्त श्री बाळासाहेब दहिफळे, तहसिलदार तथा पदसिध्द विश्वस्त डॉ. उध्दव नाईक, अॅड. श्री प्रसन्न दराडे, जेष्ठ पत्रकार सुभाष केकाण, उद्योजक अमोल गर्जे, अहिल्यानगर येथील जेष्ठ उद्योजक श्री हिरालाल शर्मा, श्री पापालाल लढ्ढा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, कर्मचारी, ग्रामस्थ व भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे पौरोहित्य वे. भुषणदेवा, वे. भास्कर देवा, वे. विशाल किडे, वे. हरी जोशी. वे. सुहास पाठक, भगवान जोशी यांनी केले.यावेळी कडा येथील देवीभक्त श्री चानोदिया परिवाराच्या वतीने अन्नदानाची पंगत देण्यात आली.







