आ.शिवाजीराव कर्डिलेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

आ.शिवाजीराव कर्डिलेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

अहिल्यानगर :  राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे प्रदीर्घ काळ मणक्याच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचार घेत होते. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हॉस्पिटलला जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

आता प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आमदार कर्डिले अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत.त्यावेळी कर्डिले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची आवर्जून भेट घेतली व मतदारसंघातील विकास कामाविषयी सविस्तर चर्चा केली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र यांनी आमदार कर्डिलेंच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. “आता पुन्हा जोमाने कामाला लागा, तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला घरात राहून चालणार नाही. पक्षाला आणि मतदारसंघाला तुमची गरज आहे,” अशा शब्दांत त्यांनी कर्डिले यांना प्रोत्साहित केले.

मुख्यमंत्र्यांच्या या भेटीने शिवाजीराव कर्डिले यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार कर्डिले हे या आधीच पुन्हा एकदा पूर्वीसारख्याच उत्साहाने जनतेच्या सेवेत रुजू झाल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकतीच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील आमदार शिवाजीराव कर्डिले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें