लोहसरचे श्री काळ भैरवनाथ देवस्थान बांधणार पंढरपूर मध्ये 3 कोटींचे भक्तनिवास

लोहसरचे श्री काळ भैरवनाथ देवस्थान बांधणार पंढरपूर मध्ये 3 कोटींचे भक्तनिवास

पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील वैभव संपन्न जागृत श्री काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे सुमारे 3 कोटी रुपये खर्चाचे भक्तनिवास बांधणार असून येत्या १ फेब्रुवारी रोजी त्याचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

लोहसर व पंचक्रोशीतील भावीक भक्तांना पंढरपूरला गेल्यावर राहण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हीच अडचण विचारत घेऊन भैरवनाथ भक्त निवास उभारण्यात येणार आहे. बांधकामासाठी सुमारे 12 गुंठे जमीन देवस्थान ट्रस्टने खरेदी केली असून या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा १ फेब्रुवारी रोजी पंढरपूर या ठिकाणी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टने आयोजित केला असून आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या शुभहस्ते या भक्त निवासाचे भूमिपूजन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी आमदार मोनिकाताई राजळे,पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक,हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे,भगवान गडचे हभप संतोष शास्त्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून लोहसर, खांडगाव, पवळवाडी, जोहारवाडी, भोसे येथील जवळपास सहाशे पेक्षा जास्त ग्रामस्थ कार्यक्रमासाठी पंढरपूरला जाणार आहेत.या पाच गावातून तब्बल १ कोटी रुपये लोकवर्गणी पहिल्या टप्यातील कामासाठी जमा झाली आहे.

पंढरपूर येथील कार्यक्रमासाठी जाण्याची व्यवस्था केलेली असून जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी यावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गिते पाटील यांनी केले आहे

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें