पाथर्डीत लवकरच इंडोअर स्टेडियम व सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार
नगरसेवक अमोल गर्जेंच्या पुढाकाराने प्रभाग पाचमध्ये विकासाला गती

पाथर्डी : पाथर्डी शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील चिंचपूर रोड लगत असलेल्या रंगार गल्ली परिसरातील पोलीस लाईनच्या जागेवर शहरातील नागरिकांसाठी इंडोअर स्टेडियम (आच्छादित क्रीडांगण) तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र वास्तू उभारण्याच्या मागणीला अमोल गर्जे यांच्या पुढाकारामुळे सकारात्मक दिशा मिळाली आहे.
या विषयावर आमदार मोनिका ताई राजळे व नगराध्यक्ष अभय काका आव्हाड यांनी संमती दर्शवत लवकरात लवकर दर्जेदार व नागरिकोपयोगी अशी वास्तू उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

अमोल गर्जे यांनी स्थानिक नागरिकांच्या गरजा ओळखून युवकांसाठी क्रीडा सुविधा व शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी आवश्यक असलेल्या या वास्तूचा मुद्दा ठामपणे मांडला. त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, निवडणुकीचा निकाल लागण्याआधीपासूनच अमोल गर्जे यांनी विविध प्रभागांमध्ये रस्ते, नागरी सुविधा व मूलभूत विकासकामांना सुरुवात करून कार्यतत्परतेचा वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. कोणतीही पदाची अपेक्षा न ठेवता केलेल्या या विकासाभिमुख कामांमुळे प्रभागांमधून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रत्यक्ष कामातून विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणून अमोल गर्जे यांची ओळख अधिक बळकट होत असून, त्यांच्या पुढाकारामुळे शहरातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.







