सामाजिक जाणिवेचे भान आणि राजकीय दूरदृष्टी असलेले नेतृत्व – कुशल दादा भापसे

Table of contents

सामाजिक जाणिवेचे भान आणि राजकीय दूरदृष्टी असलेले नेतृत्व – कुशल दादा भापसे

समाजकारणातून विकसित राजकारणाकडे वाटचाल


पाथर्डी: सचिन नन्नवरे |

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरात सामाजिक कार्य, शैक्षणिक बांधिलकी आणि लोकाभिमुख राजकारण यांचा समन्वय साधत पुढे येणारे नाव म्हणजे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कुशल प्रमोद भापसे.

केवळ वारसा हक्काने नाही तर स्वकर्तृत्वाने बनलेले नेतृत्व

माजी आमदार स्व. बाबुराव भापसे यांच्या संघर्षशील नेतृत्वाचा आणि स्व. प्रमोदराव भापसे यांच्या विचारशील राजकारणाचा वारसा लाभलेले कुशल भापसे हे हा वारसा केवळ सांगत नाहीत, तर कृतीतून जपताना दिसतात. “सत्ता नव्हे, सेवा हेच राजकारणाचे खरे स्वरूप” ही भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. तळागाळातील गोरगरीब, वंचित, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि युवक हेच त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत.

सामाजिक कार्य – आकड्यांत नव्हे, परिणामांत बोलणारे

हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व मुंबई येथील अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ नीताताई प्रसाद लाड व आमदार प्रसाद लाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल भापसे यांनी गेल्या काही वर्षांत जे कार्य केले आहे, ते जिल्हा परिषद सदस्याच्या भूमिकेसाठी भक्कम अधिष्ठान ठरते. त्यांनी आजतागायत केलेल्या सामाजिक कार्याची यादी खूप मोठी आहे. त्यांनी केलेल्या कामांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो.

शिक्षण: 

  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील अनेक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
  • २० ते २५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
  • अनेक शाळांतील गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप
  • परिसरातील शाळांमधील गुणवंत शिक्षकांचा यथोचित सन्मान, शिक्षण व्यवस्थेचा आत्मसन्मान वाढवणारा उपक्रम.

“शिक्षण हाच विकासाचा खरा पाया” हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे नेतृत्व म्हणजे कुशलदादा.

सामाजिक बांधिलकी: 

  • कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या व अपघातग्रस्त पालकांच्या १२५ हून अधिक मुलांना दत्तक घेऊन बारावी पर्यंत शिक्षण व सर्वांगीण मदतीसाठी पुढाकार
  • अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सुमारे ३५० कुटुंबांना किराणा, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू देऊन संकटकाळात सावरण्यासाठी मदत
  • आश्रमशाळा, दुर्बल घटक व विद्यार्थ्यांसाठी वर्षातून अनेक वेळा अन्न व खाऊचे वाटप

गोसेवा ते वन्यजीव संवर्धन:

  • गोशाळांतील पशुधनासाठी चारा वाटप
  • उन्हाळ्यात वन्य प्राण्यांसाठी जंगलात पाणवठे
  • पशुपक्ष्यांसाठी झाडांवर पाण्याची भांडी व घरटे
  • वन्यजीव व गोशाळांसाठी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा

खेळाडू व क्रीडा क्षेत्रासाठी योगदान: 

  • क्रिकेट खेळाडूंसाठी क्रिकेट कीटचे मोफत वाटप व  सरावासाठी मोफत मैदान
  • फुटबॉल, व्हॉलीबॉल साठी खेळाचे मोफत साहित्य उपलब्ध करून दिले

महिला सक्षमीकरण: 

  • महिला बचत गटांना सीएसआर फंडाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देणे
  • उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी विविध प्रशिक्षण शिबिरे व सक्षमीकरण उपक्रम

आरोग्यसेवा व मानवतावादी दृष्टिकोन

  • रस्ते अपघातातील जखमीना तसेच अत्यावश्यक रुग्ण व गरजवंत नागरिकांसाठी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा 
  • मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत यांसारख्या शासकीय योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना व नातेवाईकांना सहकार्य
  • रक्तदान शिबिरे, नेत्ररोग तपासणी, सर्व रोग निदान शिबिरे आयोजित.

  • स्त्रीआरोग्याबाबत संवेदनशील दृष्टीकोन.

आरोग्यसेवा ही सेवा नसून सामाजिक जबाबदारी आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

वृद्ध, गरजू व दुर्लक्षित घटकांसाठी आधार:

  • वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना कपडे व गरजेच्या वस्तूंचे वाटप.
  • समाजातील निराधार वृद्धांना मानसिक व सामाजिक आधार देणारे उपक्रम.

👉 वृद्धांचा सन्मान आणि काळजी ही संस्कृतीची ओळख असल्याचा ठाम संदेश कुशलदादांनी दिला आहे.

पर्यावरण:

  • वर्षातून अनेक वेळा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त व विविध मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन 
  • विविध ठिकाणी ग्राम स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग.
  • सौरऊर्जेचा प्रत्यक्ष वापर तसेच शाळा, महाविद्यालय, शासकीय इमारती, अंगणवाड्या, गावातील चौक, वाड्या वस्त्या व शेतीमध्ये शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी जनजागृती

👉 पर्यावरण संवर्धनात केवळ घोषणाबाजी नाही तर प्रत्यक्ष कृती आवश्यक असल्याचे ते म्हणतात.

आध्यात्मिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान

  • गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग.
  • अध्यात्मिक क्षेत्रात योगदान देत सामाजिक ऐक्य, संस्कार व मूल्यांची जपणूक.
  • शिवजयंती, रामनवमी, हनुमान जयंती यांसारखे उत्सव साजरे करून धार्मिक कार्यात योगदान
  • विविध अखंड हरिनाम सप्ताहांमध्ये अन्नदान 
  • परिसरातील विविध तीर्थक्षेत्रांना विकसित करण्यासाठी मोलाचे योगदान

👉 धार्मिकता म्हणजे केवळ विधी नव्हे, तर समाजजागृतीचा मार्ग असल्याचा संदेश ते आपल्या कृतीतून देतात.

पत्रकार व प्रशासकीय यंत्रणेचा सन्मान व प्रेरणा

  • लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना नेहमीच न्याय देऊन प्रशासनाला जाग आणण्यासाठी तत्पर असणाऱ्या पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान
  • विविध शाळेतील शिक्षकांचा गुणगौरव व सन्मान
  • वाहतूक पोलिसांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून सन्मान
  • विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचा गुणगौरव व सन्मान.

👉 समाज चालवणाऱ्या यंत्रणेला सन्मान देणारा लोकाभिमुख नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

हे सर्व कार्य निवडणुकीपुरते मर्यादित नसून, सातत्याने सुरू असलेली सामाजिक बांधिलकी आहे.

जिल्हा परिषद सदस्य म्हणून ’तिसगाव’ गटाच्या विकासाची दूरदृष्टी

जिल्हा परिषद सदस्य हा केवळ निधी वाटप करणारा प्रतिनिधी नसून, गावागावातील विकासाचा सूत्रधार असतो. त्या भूमिकेत कुशल भापसे यांनी स्पष्ट विकास अजेंडा मांडला आहे. ते स्वतः बी.एस्सी.ॲग्री सह इतर अनेक पदव्या घेऊन उच्चशिक्षित आहेत. परंतु असे असताना देखील मी सामाजिक क्षेत्रासह शेती मध्ये देखील राबणारे व जमिनीशी नातं जपणारे नेतृत्व आहेत. त्यामुळे शिक्षण, श्रम व सामाजिक भान यांचा समतोल साधणारी त्यांची जीवनशैली आहे.

त्यांच्या दृष्टिक्षेपात अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये तिसगाव गटातून लोकप्रतिनिधी म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास विविध क्षेत्रांमध्ये विकास करण्याची दूरदृष्टी आहे. ज्यामध्ये काही निवडक बाबी प्रकर्षाने मांडता येतील.

शिक्षण:

  • जिल्हा परिषद शाळांचे डिजिटलीकरण
  • विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रे व सुसज्ज ग्रंथालये
  • दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षक-विद्यार्थी पूरक उपक्रम
  • शिक्षण व विद्यार्थ्यांसाठी भरीव योगदान

शेती व ग्रामीण विकास

  • शेतकऱ्यांना सोलर पंप, पाणी आडवा-पाणी जिरवा योजनांचा लाभ
  • प्रत्येक शेतीसाठी पाणंद रस्ते निर्माण करून शेत रस्त्यांचे जाळे निर्माण करणे
  • शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचे अनुदान मिळवून देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे
  • शेतीपूरक व्यवसाय व उद्योग धंद्यासाठी शेतकऱ्यांना पाठबळ

महिला सक्षमीकरण

  • महिलांसाठी स्वतंत्र उत्पादन/सेवा कंपनी
  • स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती
  • बचत गटांना प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध करून देणे.

युवक व रोजगार

  • कौशल्य विकास उपक्रम
  • उद्योग-व्यवसाय संधींसाठी मार्गदर्शन
  • बेरोजगार युवकांच्या हाताला काम

मूलभूत सुविधा

  • वीज, पाणी, ग्रामीण रस्ते, डिजिटल सेवा
  • शेवटच्या घटकापर्यंत विविध वैयक्तिक लाभांच्या योजनांचा लाभ पोहोचवणे
  • विविध बंधारे बांधून जलव्यवस्थापन
  • प्रत्येक गावच्या स्मशानभूमीचा कायापालट
  • दलित व अल्पसंख्यांक घटकांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव मदत व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योगदान

भाजपच्या विचारधारेचा प्रभावी युवा चेहरा

कुशल भापसे यांची सर्वात ठळक ओळख म्हणजे पक्षनिष्ठा. सध्या ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असून धुळे, जळगाव, नाशिक, या जिल्ह्याचे प्रभारी म्हणून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोमाने कार्य करत आहेत. परंतु पक्ष संघटनेसह स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा आता लपून राहिलेली नाही.त्यामुळे जिल्हा परिषद तिसगाव गटातून उमेदवारी मिळाली तर संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी उघडपणे बोलून दाखवले आहे. परंतु हे सांगत असतानाच पक्ष नेतृत्वाने उमेदवारीची संधी दिली नाही तरी देखील आपण बंडखोरी करून फक्त विरोधी भूमिका घेणार नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांची ही भूमिका आजच्या राजकारणात दुर्मीळ आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड, आमदार मोनिका राजळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील व युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संघटनात्मक कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तिसगाव गटासाठी सर्वोत्तम व प्रभावशाली ठरणारा एकमेव उमेदवार 

तिसगाव जिल्हा परिषद गटाला आज विकासकामांच्या आधारावर बोलणारे, कर्तृत्व व दूरदृष्टी असलेले, सामाजिक जाणिवेतून घडलेले आणि निष्ठावान नेतृत्व आवश्यक आहे. कुशल भापसे हे केवळ इच्छुक उमेदवार नाहीत, तर कर्तृत्व, वकृत्व व नेतृत्वाचा त्रिवेणी संगम असलेले समाजाने घडवलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कार्याचा आजवरचा आलेख आणि उद्याची स्पष्ट विकासदृष्टी पाहता, जिल्हा परिषद निवडणुकीत ते मतदारांच्या विश्वासास पात्र ठरतील व समाजकारणातून विकासाकडे जाणारी ही वाटचाल तिसगावसाठी परिवर्तनाची नवी दिशा ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

सामाजिक कार्य, युवक नेतृत्व, संघटन अनुभव आणि वरिष्ठांचा विश्वास – कुशल भापसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित

कुशल भापसे यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटनेत युवक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच तीन ते चार जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत संघटनात्मक पातळीवर मोलाचे कार्य केले आहे. संघटना वाढ, युवकांचे संघटन, निवडणूक व्यवस्थापन आणि पक्षविस्तार यामध्ये त्यांचे योगदान लक्षणीय राहिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व महायुतीचे मुख्य समन्वयक असलेले आमदार प्रसाद लाड हे भापसे यांचे जवळचे नातेवाईक आहेत, तसेच शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कुशल भापसे यांनी तिसगाव परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. शिक्षण, युवक मार्गदर्शन, समाजोपयोगी उपक्रमांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, माजी खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील आणि युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांच्याशी त्यांचे घनिष्ठ व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पक्ष संघटना, सामाजिक कार्य आणि विकासाबाबतची दूरदृष्टी, तसेच स्वतः युवकांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून कुशल भापसे यांची ओळख आहे. या सर्व बाबींचा विचार करता पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात कोणतीही अडचण नाही, अशी चर्चा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे त्यामुळे कुशल भापसे यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

 

संकलन: सचिन नन्नवरे, मुख्य संपादक

(महाराष्ट्र ऑल इन वन), 8888770819

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें