शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी – परमेश्वर टकले

शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी-परमेश्वर टकले

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
बीड शहरातील नामांकित उमाकिरण संकुल येथे प्रोफेशल अकादमी मधील विद्यार्थींनी बाबत झालेला प्रकार अतिशय निदंनीय असून शिक्षक हा राष्ट्र निर्मितीचा महत्वाचा कणा मानला जातो, परंतु शिक्षकच व्यभिचारी, दुराचारी असेल तर मुलांनी आदर्श कोणाचा घ्यायचा? उमाकिरण संकुल मधील प्रशांत खाटोकर, प्रा. विजय पवार या नराधमांनी केलेला प्रकार शिक्षकी पेशाला कलमा फासणारा असून शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या नराधमाला सोडू नका, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मराठा मावळा संघटनेच्या वतीने करण्यात आली.
आज भारत विश्व गुरू म्हणून ओळखला जात असतांना गुरू शिष्य परंपरेचा खूप मोठी उज्ज्वल परंपरा असतांना शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या बीड येथील नराधमाला सोडू नका. अनेक पालक लाखो रुपये भरून आपल्या मुला मुलींचं भविष्य घडवतील म्हणून कोचिंग क्लास मध्ये मुलांना पाठवतात व मुलांना शिकवणे त्यांना संस्कारीत करण्याऐवजी हे दळभद्री नराधम असे चाळे करतात. यात पोलिसाने नराधमाला भर नागडं करून ओल्या बांबूने झोडपावे व आरोपीना कसल्याही पळवाटा काढू देऊ नका, त्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.तसेच या घटनेचा पाथर्डी तालुका मराठा मावळा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें