लिंगायत संघर्ष समिती महिला आघाडीच्या पाथर्डी तालुका अध्यक्ष पदावर सौ.रेणुका फुलशेटे यांची निवड

लिंगायत संघर्ष समिती महिला आघाडीच्या पाथर्डी तालुका अध्यक्ष पदावर सौ.रेणुका फुलशेटे यांची निवड

पाथर्डी प्रतिनिधी सुयोग कोळेकर

संपुर्ण महाराष्ट्रातील लिंगायत बांधवांचे शीर्ष नेतृत्व करणाऱ्या लिंगायत संघर्ष समितीच्या महिला आघाडीच्या पाथर्डी तालुकाध्यक्ष पदावर सौ.रेणुका फुलशेटे यांची निवड करण्यात आली.लिंगायत संघर्ष समितीचे राज्य समन्वयक तथा सहकार शिरोमणी श्री काकासाहेब कोयटे,प्रदेश अध्यक्ष श्री सुनिल रुकारी,कार्याध्यक्ष सरलाताई पाटील यांचे संमतीने अहिल्यानगर चे जिल्हाध्यक्ष श्री संतोष जिरेसाळ यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
ज्या महात्मा बसवेश्वर यांनी भारतात सर्वप्रथम महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क प्रदान केला त्यांच्या कार्याची महती सर्वदूर पोचवत महिलांचे संघटन करून त्यांचा न्याय हक्कासाठी काम करण्याचा संकल्प यावेळी सौ.फुलशेटे यांनी केला.
सौ.फुलशेटे यांच्या झालेल्या या निवडी बद्दल त्यांचे त्यांचे लिंगायत नेते श्री प्रभाकर अण्णा इजारे, लिंगायत संघर्ष समितीचे पाथर्डी तालुकाध्यक्ष सचिन फुटाणे,उपाध्यक्ष सुहास शेळगावकर,गजानन तारापुरे,अभिजीत गुजर,संजीवकुमार चेलवे सर यांनी अभिनंदन केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें