तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा महिलांनी लाभ घ्यावा – मयूर कुलकर्णी

तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा महिलांनी लाभ घ्यावा – मयूर कुलकर्णी

ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांच्या वस्तूला बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा यामागचा उद्देश…!

शेवगाव प्रतिनिधी ( इसाक शेख )

नेवासा तालुक्यातील भेंडा या ठिकाणी मंगळवार दि. १८ मार्च २०२५ ते शुक्रवार दि. २१ मार्च २०२५ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर तसेच नेवासा येथील ज्ञानेश्वरी लोकसंचलीत साधन केंद्र संचलित नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत मा.वि.म. बचत गटातील महिलांचे उत्पादित वस्तुचे तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या भव्य प्रदर्शनाचा व विक्री महोत्सवाचा जिल्ह्यातील सर्व महिला बचत गटांनी लाभ घ्यावा असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे तालुका व्यवस्थापक मयूर कुलकर्णी यांनी केले आहे.

पुढे अधिक माहिती देताना कुलकर्णी म्हणाले की, ग्रामिण व शहरी भागातील बचत गटातील महिला बँक कर्ज व अंतर्गत कर्ज घेऊन विविध योजनेचा लाभ घेऊन उद्योग व्यवसाय करीत आहे. या महिलांच्या वस्तूला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या करिता नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये बचत गटातील महिलांचे १०० पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात येणार असुन आपण या तालुकास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव २०२५ ला भेट देऊन खरेदीचा आनंद घेऊन बचत गटातील महिलांचे मनोबल वाढवावे असे आवाहन देखील महिला आर्थिक विकास महामंडळाचे तालुका व्यवस्थापक मयूर कुलकर्णी यांनी केले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें