महाराष्ट्र केसरी आयोजनाचे जिल्हा तालीम संघाचे रोहित पवारांना पत्र

महाराष्ट्र केसरी आयोजनाचे जिल्हा तालीम संघाचे रोहित पवारांना पत्र

अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आमदार रोहित पवार यांना कर्जत येथे ६६ वी वरिष्ठ गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजन करण्याबाबतचे पत्र देण्यात आले. आमदार रोहित (दादा) पवार मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन स्वीकारण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा तालीम संघाचे खजिनदार नाना डोंगरे, नगर शहर तालीम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, पाथर्डी तालुका तालीम संघाचे सचिव पप्पू शिरसाठ, शेवगाव तालुका तालीम संघाचे अध्यक्ष विक्रम बारवकर, ऋषिकेश धांडे, काका शेळके, मिठू धांडे, विजय मोढळे, आसिफ शेख आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा तालीम संघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाच्या आयोजनाची मागणी केली होती. त्याला मान्यता मिळाली असून, या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें