डॉ.राजधर टेमकर यांची करिअर कट्टा अंतर्गत प्राचार्य प्रवर्तकपदी निवड

डॉ.राजधर टेमकर यांची करिअर कट्टा अंतर्गत प्राचार्य प्रवर्तकपदी निवड

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण: 

तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजधर टेमकर यांची महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असणाऱ्या “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी राज्यस्तरावर विभागीय प्राचार्य प्रवर्तक म्हणून निवड झाली आहे.

“करिअर कट्टा” या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा व या उपक्रमाच्या माध्यमातुन युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरावर विविध उपक्रम राबवणे विशेषतः स्पर्धापरीक्षा तयारी, उद्योजकता, कौशल्य विकास, मुलाखती, विविध क्षेत्रातील भरती प्रक्रिया इ.उपक्रम प्रभावीपणे राबवणे या उद्देशाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजधर टेमकर यांची निवड झाली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल व आजपर्यंत राबविण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमबद्दल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे,समन्वयक किरण पाटील, श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.आप्पासाहेब राजळे,आमदार मोनिकाताई राजळे, विश्वस्त राहुलदादा राजळे, कार्यकारी संचालक अमोल पाटील,सचिव आर.जे. महाजन, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष शिवाजीराव राजळे, मार्गदर्शक भास्करराव गोरे, कार्यालयीन अधीक्षक विक्रम राजळे, महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वक डॉ.किशोर गायकवाड,प्रा.चंद्रकांत पानसरे, डॉ.अतुल चौरपगार व सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें