बापूसाहेब पाटेकर यांनी आजारावर मात करून मिळवले नवजीवन

बापूसाहेब पाटेकर यांनी आजारावर मात करून मिळवले नवजीवन

प्रतिनिधी: दिपक खोसे, ढोरजळगाव 

एक वर्षापूर्वी दुर्धर आजाराशी झुंज देत असताना आयुष्याने कठीण वळणावर आणून ठेवलेले भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बापूसाहेब पाटेकर आज पूर्णपणे निरोगी झाले असून, त्यांनी आपल्या उपचारकर्त्या डॉक्टरांप्रती आणि सोबत उभ्या राहिलेल्या सर्वांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.

      सिग्मा हॉस्पिटल, संभाजीनगर येथील डॉ.स्तुती तोष्णिवाल (हेमाटोलॉजिस्ट, डीएम) आणि डॉ. अनुप तोष्णिवाल (हेमाटोलॉजिस्ट, डीएम)  यांच्या कुशल उपचारांमुळे आणि सहानुभूतीपूर्ण वर्तणुकीमुळे पाटेकर यांना नवजीवन मिळाले. “डॉक्टरांच्या आत्मविश्वासपूर्ण शब्दांनी मला नव्या उर्जेचा संचार झाला आणि जीवनाकडे पुन्हा सकारात्मकतेने पाहता आले,” असे ते भावनिक होत म्हणाले.

       तसेच शेवगावचे सुपुत्र डॉ. झाडे यांनीही उपचारांच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाची भूमिका बजावली. सिग्मा हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय टीमच्या समर्पणामुळेच आज मी पुन्हा निरोगी जीवन जगत आहे, असे पाटेकर यांनी सांगितले.

       या निमित्ताने भाजपा नेत्या आमदार मोनिका राजीव राजळे यांनी स्वतः सिग्मा हॉस्पिटल येथे भेट देऊन डॉ. स्तुती तोष्णिवाल, डॉ. अनुप तोष्णिवाल आणि डॉ. झाडे यांचा सत्कार करून आभार मानले. या प्रसंगी अँड. नरेंद्र पाटेकर, साहेबराव तानवडे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार राजळे यांनी डॉक्टरांच्या सेवाभावाचे आणि रुग्णप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक करत, “अशा वैद्यकसेवेमुळेच अनेकांना नवजीवन मिळते,” असे मत व्यक्त केले.

    बापूसाहेब पाटेकर यांनी आपल्या पुनर्वसन काळात साथ देणाऱ्या परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांचेही मनःपूर्वक आभार मानले. “त्यांची प्रार्थना, विश्वास आणि साथ हेच माझ्या बरे होण्याचे खरे औषध ठरले,” असे त्यांनी नम्रतेने सांगितले.

      आज स्वतःकडे पाहताना “मी तुमच्यामुळेच बरा झालो” हे शब्द माझ्या मनातून उमटतात, आणि ते फक्त आभार नाहीत तर माझ्या पुनर्जन्माची साक्ष आहेत, असे ते म्हणाले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें