सातवडच्या रस्ता डांबरीकरणासाठी आ.शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून ५० लाखांचा निधी

सचिन नन्नवरे
पाथर्डी तालुका: जिल्हा वार्षिक योजना (डीपीडीसी २०२५) अंतर्गत “रस्ते विकास” या घटकातून पाथर्डी तालुक्यातील सातवड गावाला तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून राज्य मार्ग २२२ सातवड फाटा ते सातवड या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. राहुरी नगर–पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला असून, गावकऱ्यांनी आ.कर्डिले यांचे आभार मानले आहेत.
आमदार कर्डिले यांनी यापूर्वीही सातवड येथे ढोलेश्वर मंदिर सभामंडप, मारुती मंदिराचा जिर्णोद्धार, कुशाबा रस्ता, हायमॅक्स यांसह अनेक विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सातवड गावावर आमदार कर्डिले यांचे विशेष प्रेम असल्याचे ग्रामस्थांकडून अधोरेखित करण्यात आले.
या निधीसाठी सातवडचे चेअरमन व भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते बंडू पाठक यांनी आ.कर्डिले व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अक्षयदादा कर्डिले यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.त्यामुळे हा निधी प्राप्त झाला असून सुमारे ५० लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल सातवड येथील चेअरमन बंडू पाठक, भाऊ वाघ, डॉ.भगवान वाघ, कानिफ पाठक, विनोद सरोदे सर, शहाजी पाठक, आमोल पाठक, पोपटराव पाठक, किशोर वाघ, नवनाथ वाघ, सुरेश पाठक, भाऊसाहेब पाठक, संजय वाघ, संभाजी पाठक, जनाभाऊ पाठक, साहील पाठक, दीपक सरोदे, अनिल पाठक, दत्तात्रय वाघ, राजेंद्र पाठक, विनायक पाठक, रामनाथ वाघ आदीसह ग्रामस्थांनी आमदार शिवाजीराव कर्डिले व युवानेते अक्षयदादा कर्डिले यांचे आभार मानले आहेत.







