मिरी येथे ‘अष्टविनायक पेट्रोलियम’ चे लोकार्पण
मिरी परिसरात उद्योग उभारण्यासाठी सहकार्य करू: खा.सदाशिव लोखंडे

सचिन नन्नवरे, मिरी:
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे स्वातंत्र्यदिन व कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मिरी–पांढरीपूल रस्त्यावरील राजयोग मंगल कार्यालयाजवळ ‘अष्टविनायक पेट्रोलियम’ या इंडियन ऑईलच्या अत्याधुनिक पेट्रोल पंपाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
यावेळी बोलताना माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले की, मिरी हे गाव चार तालुक्यांना जोडणारे गाव असून या परिसरात नवीन उद्योगधंदे उभे करून या भागातील बेरोजगारांना नोकऱ्या देऊन हा भाग औद्योगिकदृष्ट्या विकसित करण्याची खरी गरज असून त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले.त्यासाठी आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार मोनिकाताई राजळे यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील खासदार सदाशिव लोखंडे यांनी यावेळी केले.

पेट्रोलपंपाचे उद्घाटन रामायणाचार्य ह.भ.प.श्रीनिवास महाराज घुगे यांच्या शुभहस्ते व शिर्डीचे माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार मोनिकाताई राजळे व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी ह.भ.प. सुखदेव महाराज गाडेकर, ह.भ.प.जाधव महाराज माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, युवानेते प्रशांत लोखंडे, कारखान्याचे संचालक बबनकाका भुसारी, चारुदत्त वाघ, आव्हाने येथील गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मालोजीराजे भुसारी, माजी सभापती अंबादास कळमकर, चेअरमन एकनाथ मोरे, बंडू पाटील बोरुडे, सोमनाथ अकोलकर, सरपंच बाळासाहेब कचरे, सरपंच जालिंदर गवळी, उपसरपंच विजय गुंड,भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, पै.मच्छिंद्र नाना शिंपणकर व निवृत्ती दातीर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याची हमी पेट्रोलपंपाचे मालक विजयशेठ कोळगे,रामदास कोळगे,संतोष कोळगे आदींनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक सचिन नन्नवरे यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर उद्योजक विजयशेठ कोळगे व समस्त कोळगे परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर अनेकांची रीघ सुरू होती. या पेट्रोलपंपामुळे मिरी गावच्या वैभवात भर पडली असून येत्या काळात त्याचा फायदा गावातील अनेक वाहनधारकांना, व्यावसायिकांना तसेच शेतकरी व बेरोजगारांना होणार असल्याने गावच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन मिरीचे माजी सरपंच तथा भाजपाचे मंडळ तालुका अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केले.








