श्री कानिफनाथ विद्यालयाच्या १९९३ सालच्या दहावीच्या बॅचचा भावनिक स्नेहमेळावा संपन्न

श्री कानिफनाथ विद्यालयाच्या १९९३ सालच्या दहावीच्या बॅचचा भावनिक स्नेहमेळावा संपन्न

माजी विद्यार्थी आणि गुरुजनांच्या सहवासात जुन्या आठवणींना उजाळा

जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) — श्री कानिफनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १९९३ सालच्या दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तब्बल तीन दशकांनंतर पुन्हा एकदा एकत्र आलेले विद्यार्थी आणि त्यांचे गुरुजन यांच्या भेटीचा हा क्षण भारावणारा ठरला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते तथा संस्थाचालक श्री.उद्धवराव वाघ (माजी चेअरमन, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, आदिनाथनगर) यांनी शुभेच्छा देताना, जुन्या विद्यार्थ्यांचे कार्य पाहून विद्यालयास आपला सार्थ अभिमान असल्याचे सांगून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी माजी प्राचार्य पुंड सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच श्री. चारुदत्त वाघ यांच्यासह, उपसरपंच अमोल गवळी, माजी प्राचार्य कराळे सर, माजी प्राचार्य नेहुल सर आणि विद्यमान प्राचार्य वांढेकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेतील आजी-माजी शिक्षकवृंद, कर्मचारी व १९९३ च्या बॅचचे अनेक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकमेकांना भेटताना आणि जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.

या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनामध्ये अरुण वाघ, संजय पाटेकर मेजर, आदिनाथ कराळे, बाळासाहेब शिंदे, आंधळे मॅडम, सुलभा जमदाडे यांचे मोलाचे योगदान राहिले. हा स्नेहमेळावा हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर 30 वर्षांच्या मैत्री, शिक्षकांच्या संस्कारांची आणि शाळेच्या ऋणात बांधलेल्या प्रत्येक हृदयाची एक सुंदर आठवण बनून राहिला.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें