शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचा पदवीधर डी.एड. शिक्षक शिक्षकेतर संघाच्यावतीने सत्कार
पाथर्डी प्रतिनिधी: पुणे येथील श्रीमती संध्या गायकवाड यांनी नुकताच माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षक शिक्षकेतर संघाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.
या अगोदर त्या सहाय्यक संचालक म्हणून महाराष्ट्र शासन संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे कार्यरत होत्या. तेथे त्यांनी एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपल्या कार्याची ओळख निर्माण केली होती. अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षक संघाचे वतीने करण्यात आला.
या वेळी राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद काळपुंड, जिल्हाध्यक्ष रंगनाथ मोरे, जिल्हा सचिव विजय विधाते, महिला आघाडी प्रमुख मीना सदाफुले यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी गायकवाड यांचा पुष्पगुच्छ/ बुके देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सहसचिव अरुण शेलार ,प्रा. विनायक जाधव, गोकुळ ठाकूर, नेवासा तालुका सदस्य प्रल्हाद वाघमारे, माधव म्हस्के, अकोला तालुका अध्यक्ष सचिन देशमुख, नरेश साळवे, सचिव शशिकांत काटे, श्रीमती काळोखे, सागर धनवडे व इतर संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.
त्याप्रसंगी शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी संघटनेस सहकार्य करून त्यांचे प्रश्न, समस्या निश्चित सोडवून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. शेवटी श्री गोकुळ ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले.