अक्षर संस्कार शिबिरासारखे उपक्रम वर्षभर राबविले पाहिजे- अरविंद पारगावकर
संत सेवादास महाराज मंदिर सभागृहात अक्षर संस्कार शिबिर समारोप
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
अक्षर संस्कार शिबिरा सारखे उपक्रम फक्त सुट्टी पर्यंत न राबवता पुन्हा पुन्हा एकत्र येऊन जे सहभागी होतील त्यांना घेऊन वर्षभर राबविले पाहिजे, असे आवाहन अरविंद पारगावकर यांनी केले.
वसंतराव नाईक वाचन मंदिर या संस्थेच्या वतीने शहरातील आनंदनगर येथील श्री सद्गुरू संत सेवादास महाराज मंदिर सभागृहातआयोजित अक्षर संस्कार शिबीर -२०२५ चा समारोप तालुका संघ चालक माजी मुख्याध्यापक अरविंद पारगावकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. सुनील महाजन (टॅक्स कन्सल्टंट), अमित आव्हाड, डॉ.सागर भापकर, जेष्ठ भाजपा नेते अशोक चोरमले, कौतुक चिंतामणी यांच्या उपस्थितीत करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजची पिढी ही फार सकारात्मक आणि रचनात्मक कार्य करणारी आहे, त्याना संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या लहान मुलांसाठी वाचनीय असणारे बाल – वांड:मय व्यक्तिमत्व विकास आणि छान छान गोष्टीचे १०० पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पारगावकर यांनी दिले
सूत्रसंचालन शिबिराचे समन्व्यक सचिन चव्हाण, प्रास्ताविक शिवाजी चव्हाण तर आभार विष्णुपंत पवार यांनी मानले.