पाथर्डीत बौद्ध पौर्णिमा साजरी
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
पाथर्डी परिसरातील तनपुरवाडी शिवारामध्ये बौद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने येथील बौद्ध विहारात ग्राम विकास प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने श्रामणेर भिक्कु संघाच्या उपस्थितीत त्रिशरण, पंचशिल ग्रहण करून बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी स्वांतत्र्य सैनिक मोहनराव गाडे जीवन गौरव पुरस्कार आयु. श्री. श्रीपत बळीद दादा यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. श्री. सुंदरमामा कांबळे होते.यावेळी प्राचार्य श्री. रतिलाल क्षेत्रे यांनी धम्मदेसना व सर्वासाठी मंगल कामना केली. विजय हुसळे यांनी प्रभावी असे धम्म प्रबोधन केले. वंचितचे तालुका अध्यक्ष श्री. पप्पुशेठ बोर्डे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बौद्धाचार्य हिरामण थोरात, सुरज क्षेत्रे, लौकीक कांबळे सह केद्रीय शिक्षक श्री. निसर्गध गुरुजी, एकनाथ ठोकळ, रामदास सोनवणे, अरूण थोरात, प्रा. अशोक डोळस, श्री साळवे, उपासिका मंदाकीनी गाडे, मिनाताई शिंदे, सौ. ठोकळ,सौ.बळीद तसेच बौद्ध परिवारातील सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक महेंद्र राजगुरू यांनी केले. प्राचार्य दिलीप सरसे यांनी सूत्रसंचालन केले तर मा. तहसीलदार जगदीश गाडे यांनी आभार मानले. गाडे परिवारातर्फे सर्वांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली.