मिरी येथे वै.सद्गुरु रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या ६१ व्या नारळी सप्ताहाची भव्य सुरुवात

मिरी येथे वै.सद्गुरु रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या ६१ व्या नारळी सप्ताहाची भव्य सुरुवात

सचिन नन्नवरे 
मिरी: वारकरी संप्रदायाचे भूषण राहिलेले वै.सद्गुरू रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या ६१ व्या नारळी सप्ताहाची मंगळवारी पाथर्डी तालुक्यातील मिरी सवाद्य दिंडी प्रदक्षिणा होऊन मोठ्या थाटात सुरुवात झाली.
    वृद्धेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.भागवत महाराज उंबरेकर, ह.भ.प.भागवत महाराज वेताळ, ह.भ.प.जगन्नाथ महाराज गवळी, ह.भ.प.सुभाष महाराज राऊत व ह.भ.प.मच्छिंद्र महाराज गायकवाड यांच्या हस्ते टाळ, मृदंग, विना, व प्रतिमा पूजन करून सप्ताहास सुरुवात करण्यात आली.
     आठ दिवस चालणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काकडा भजन, विष्णुसहस्त्रनाम, शिवलीलामृत पारायण, गाथा भजन, तुकाराम महाराज चरित्र, हरिपाठ, नामजप यासह सकाळी व संध्याकाळी हरिकीर्तन होणार असून दररोज भाविकांना अन्नदान देखील केले जाणार आहे. त्यामुळे या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मिरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
     या सप्ताहात पहिल्या दिवशी संध्याकाळी ज्ञानेश्वर महाराज शिंदे, दुसऱ्या दिवशी गोविंद महाराज शिंदे व जयंत महाराज गोसावी, तिसऱ्या दिवशी विठ्ठल महाराज दिवेगावकर व केशव महाराज नामदास, चौथ्या दिवशी देविदास महाराज म्हस्के व रामकृष्ण महाराज लहवितकर, पाचव्या दिवशी महादेव महाराज रानडे व मारुती महाराज तुनतुने शास्त्री, सहाव्या दिवशी प्रभाकर नाना झोनकर व गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर तसेच सातव्या दिवशी उद्धव महाराज मंडलिक व भागवत महाराज उंबरेकर यांचे हरिकीर्तन होणार असून मंगळवार दिनांक २२ रोजी सकाळी भागवत महाराज उंबरेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
    मिरी येथे दरवर्षी होणारे सर्व सप्ताह रद्द करून हा एकमेव सप्ताह भव्य स्वरूपात आयोजित केला असून यासाठी अनेक दानशूर भाविकांनी आर्थिक मदत देखील केली आहे. त्यामुळे या सर्व कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटी व मिरी ग्रामस्थानी केले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें