अरणगाव येथे समाज परिवर्तन संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिर
अहिल्यानगर प्रतिनिधी:
रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव येथे अहिल्यानगर समाज परिवर्तन संस्था (एफ २३७८८) तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन अरणगावचे सरपंच व ग्रामस्थ यांच्या हस्ते आणि डॉ. विनोद काकडे तालुका वैद्यकीय अधिकारी नगर, डॉ. अनिल ससाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद काकडे हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. सविता ससाणे, डॉ. श्रीमती लगड, सामाजिक कार्यकर्ते मोहन शिरसाठ तसेच वाळकी येथील ग्रामस्थ हे उपस्थित होते.
आरोग्य शिबिराच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. अरणगावचे सरपंच यांनी आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल समाज परिवर्तन संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र वाळकी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अरणगाव तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय यांनी चांगले काम केले. ग्रामीण भागामध्ये तज्ञ डॉक्टर मार्फत रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला व उपचार केल्याबद्दल त्यांनी संबंधित डॉक्टरांना धन्यवाद दिले. डॉ. विनोद काकडे यांनी आरोग्य शिबिर आयोजन करून रुग्णांना सेवा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
आरोग्य शिबिराचा पन्नास रुग्णांनी लाभ घेतला आहे.या मोफत आरोग्य शिबिरामध्ये स्रिरोग तज्ञ डॉ.भास्कर रणनवरे, डॉ. सविता ससाणे, डॉ. श्रीमती लगड,सर्व सिस्टर्स व सर्व स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज परिवर्तन संस्थेचे डॉ.भास्कर रणनवरे यांनी केले तर आभार डॉ. अनिल ससाणे यांनी मानले.