वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी श्रीकांत बोर्डे यांची निवड

वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी श्रीकांत बोर्डे यांची निवड

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
मंगळवार दिनांक ८ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पाथर्डी तालुका कार्यकारिणी निवडीसाठी पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे मुलाखती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष योगेशभाऊ साठे उपस्थित होते.
यावेळी पाथर्डी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या.
या प्रसंगी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसेन,शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, पाथर्डी महीला तालुका उपाध्यक्षा रोहिणी ठोंबे,जिल्हा संघटक रवींद्र निळ, सुधीर ठोंबे, जिल्हा सल्लागार जे.डी. सिरसाठ, सुरेश जाधव, महेंद्र राजगुरू,अमोल मिरपगार, आकाश शिंदे, पोपट मिरपगार,आयु. भिमराव शिंदे, डॅनियल मिरपगार,आयु प्रविण बळीद, देविदास भारस्कर, आनंद उबाळे, सचिन निळ, दत्तात्रय सातपुते, गणेश पाटोळे, विलास वाघमारे रवींद्र मिरपगार,राजू पवार, श्रीकांत ( पप्पूशेठ) बोर्डे, शुभम जगदाळे, भारतीय बौद्ध महासभेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष श्रीपत बळीद व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वानुमते चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत (पप्पूशेठ) बोर्डे यांची पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, प्रस्थापीत सगळेच पक्ष बहुजन समाजाच्या मतांचा वापर फक्त सत्तेत जाण्यापूरताच करतात आणि नंतर त्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, त्यामुळे सध्याला राज्यात बहुजणांच्या संविधानिक हक्क अधिकाराची लढाई फक्त वंचित बहुजन आघाडीच करत आहे. तरी यापुढे सर्वांनी बहुजन समाजातील मूलभूत प्रश्नासाठी जागरूक राहून लोकशाही मार्गाने आंदोलन करून प्रश्न सोडवावे लागेल. गावोगाव स्वभामानी तरुणाचे संघटन उभे करुन भविष्यात राजकीय सत्तेचा वाटा घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू.
यावेळी उपस्थितांचे आभार युवा कार्यकर्ते आकाश शिंदे यांनी मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें