चिचोंडी येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी
श्रीरामाचे जयघोष, फटाक्यांची आतिषबाजी व मिरवणुकीने वातावरण झाले भक्तिमय

शिराळ चिचोंडी : पाथर्डी तालुक्यातील श्री राम सेना व सकल हिंदू समाज यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी नऊ वाजता चिचोंडी येथे श्रीरामाच्या प्रतिमेला एकनाथ हटकर, ग्रामपंचायत सदस्य आबा गरुड, संदीप दानवे, माजी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल गायकवाड, गीतेवाडीचे सरपंच जनार्दन गीते, उपसरपंच रामेश्वर गीते, डमाळवाडी चे सरपंच अंबादास डमाळे, डोंगरवाडी चे सरपंच उद्धव गीते, माजी सरपंच महादेव गिते, छत्रपती युवा ग्रुप चे अध्यक्ष नागेश आव्हाड, रामेश्वर गीते, भगवान फुलमाळी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली.
या उत्सवासाठी गावातील अनेक युवक मंडळे, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. यामध्ये अक्षय डोळसे,आदेश काळापहाड, महेश आव्हाड,नितीन आव्हाड, आनंद जऱ्हाड , गणेश शिंदे, नितीन तुपे, ऋषिकेश जऱ्हाड, दादा घाडगे, अनिकेत आव्हाड, संदीप पालवे, रितेश काळे, कार्तिक गंडाळ, पैलवान कांबळे, अक्षय जाधव, आनंद तिवारी, अक्षय भिंगारदिवे, व्यापारी रावसाहेब कांबळे, शुभम गरुड, कमलेश गुगळे, विजय आव्हाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोपट आहेर आणि अक्षय भिंगारदिवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.