गरीब परिस्थितीमुळे आश्रम शाळेत शिक्षण घेऊन कोल्हारची अश्विनी झाली फौजदार

गरीब परिस्थितीमुळे आश्रम शाळेत शिक्षण घेऊन कोल्हारची अश्विनी झाली फौजदार

अशोक मोरे, करंजी (प्रति) – नगर-पाथर्डी महामार्गावरील बारव येथील राजमाता आश्रम शाळेत शिक्षण घेऊन कु.अश्विनी भरत पालवे हिची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी परिक्षेतुन थेट पोलिस उपनिरीक्षकपदी (PSI) म्हणजेच फौजदार पदी निवड झाल्याने राजमाता आश्रम शाळेत तिचा सत्कार करण्यात आला. अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन मिळविलेल्या यशाबद्दल अश्विनी हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील कु.अश्विनी भरत पालवे हिचे आई वडीलांना उदरनिर्वाहासाठी कोणताही उत्पन्नाचा स्रोत नसल्याने ते मोलमजुरी व शेतीची कामे करून आपल्या कुटुंबाची भूक भागवत होते.त्यामुळे घरच्या गरीब परिस्थितीमुळे पालवे दांपत्याने मुलगी अश्विनी हिला शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये या उद्देश्याने तिला आश्रमशाळेत दाखल करण्याचा निर्णय काळजावर दगड ठेवून घेतला.

त्यामुळे अश्विनी हिने पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण सन २००६ ते २०१६ च्या दरम्यान नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटाच्या वरील बारव येथे असलेल्या राजमाता आश्रम शाळेत शिक्षण घेतले.परंतु आधीच गरीब परिस्थिती मुळे अत्यंत कष्टातून संसाराचा गाडा हाकणाऱ्या अश्विनीच्या वडिलांनी ती चौथीत असताना या जगातून निरोप घेतला.त्यामुळे अश्विनीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र देखील हरवले.

त्यानंतर आई अलकाबाई यांनी मोलमजुरी करून आपल्या दोन मुले व तिन मुलींचे शिक्षण करुन त्यांना उच्चशिक्षित करुन स्वतःच्या पायावर उभे केले.नुकताच अश्विनीचा निकाल लागल्यावर अश्विनी हिच्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य दानवे यांच्यासह प्राध्यापक चितळे, थोरवे, मराठे, अकोलकर, रामनाथ पवार, बाबासाहेब शेरकर, तसेच शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु.अश्वीनी पालवे हिचा विशेष सत्कार केला व तिच्या यशाबद्दल कौतुक केले.

एका आश्रम शाळेत शिकलेल्या मुलीने एवढे मोठे यश संपादन केल्याबद्दल परिसरातुन तिचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें