वडिलांच्या उपक्रमाचा वारसा; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन

मिरी :  पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील दिवंगत माजी उपसरपंच भुजंगराव उर्फ आबा गवळी यांनी २०११ साली सुरू केलेला उपक्रम आजही त्यांच्या  मुलांकडून अविरतपणे सुरू ठेवण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एक दिवस मोफत मिष्ठान्न भोजन दिले जाते. शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षातून एकदा तरी शाळेतच मिष्ठान्न भोजन मिळावे या उद्देशाने आबा गवळी यांनी सुरू केलेला हा उपक्रम त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.

आबा गवळी यांचे बंधू राजू नेते गवळी यांच्यासह श्रीराम गवळी आणि प्रशांत गवळी या चिरंजीवांनी हा उपक्रम अग्रत सुरू ठेवला असून भविष्यातही अखंड सुरू ठेवणार असल्याचे यावेळी सांगितले आहे. दिवंगत आबा गवळी यांचा समाजसेवेचा वारसा पुढे नेत विद्यार्थ्यांना आनंद मिळवून देणे, हा आमचा हेतू असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. या वेळी स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुभाष गवळी, मुख्याध्यापक निलेश क्षीरसागर यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.गवळी कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें