सातवड येथे संत्र्याच्या बागेत आढळला युवकाचा मृतदेह, घातपाताचा संशय!

सातवड येथे संत्र्याच्या बागेत आढळला युवकाचा मृतदेह, घातपाताचा संशय!

करंजी (अशोक मोरे): पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील सोमनाथ रामराव पाठक या इसमाचा मृतदेह त्यांच्या रहात्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या संत्र्याच्या बागेत आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली असुन त्याच्या शरीरावरील खुणा पाहुन हा घातपाताचा प्रकार असल्याचे समजते.

पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील सोमनाथ रामराव पाठक (वय ३५ वर्षे) या इसमाचा मृतदेह आज सकाळी त्यांच्या घराच्या मागील बाजुस असलेल्या संत्र्यांच्या बागेत आढळुन आला. त्याच्या शरीरावर असलेल्या जखमावरुन हा घातपातच असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या डोक्याला मार असुन पाय मोडुन टाकलेले दिसत असुन पाठीवर तसेच हातावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. त्यावरुन हा घातपातच असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सोमनाथ पाठक याचे तिसगाव येथे मेडिकल दुकान होते परंतु काही कारणास्तव ते त्यांनी काही दिवसापुर्वी बंद केले असल्याचे समजते. त्यास एक मुलगा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधिक्षक सुनिल पाटील, पाथर्डी पोलिस स्टेशनचे पीआय संतोष मुटकुळेसह हरिभाऊ दळवी, टकलेसह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकास व ठसे तज्ज्ञास पाचारण केले. पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनास पाठवुन दिला. सोमनाथ पाठक याच्या मृत्युविषयी नागरिकात उलटसुलट चर्चा चालु आहे.

>> शवविच्छेदन अहवालानंतर सोमनाथ पाठक यांच्या मृत्युचे कारण उघड होईल. त्यानंतर या घटनेचा तपास पोलिस करतील. घातपात निष्पन्न झाल्यास गुन्हेगारांना लवकरच गजाआड केले जाईल-  संतोष मुटकुळे (पोलिस निरीक्षक ,पाथर्डी पोलिस ठाणे)

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें