भालेश्वर विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील भालगाव येथील भालेश्वर हायस्कूल विद्यालयामध्ये जागतिक महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हनुमान गोर्डे,सौ. संगीता खेडकर, सौ. रंजना खेडकर, सौ.ज्योती खेडकर, सौ.डॉ. परजणे, श्रीमती फुंदे यांच्या उपस्थितीत कर्मयोगी आबासाहेब काकडे, स्व. निर्मलाताई काकडे, विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक श्री. गोर्डे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी महिला या “अबला नसून सबला आहेत” असे गौरवोद्गार काढले. आज सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रगती केलेली आपल्याला दिसून येत आहे आणि असेच उत्तरोत्तर प्रगती या महिलांमध्ये व्हावी, यासाठी सर्व महिलांना त्यांनी या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.श्रीमती आढाव रेखा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री.श्रीकांत सोनवणे यांनी केले तर श्रीमती सुनिता भालेराव यांनी आभार मानले.