आनंद करंडक वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी बाफना प्रथम

आनंद करंडक वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी बाफना प्रथम

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
शहरातील श्री आनंद महाविद्यालयाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष विज्ञान वर्गातील सिद्धी बाफना या विद्यार्थिनीला रोख रु. ३००० व स्मृती चिन्ह देऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन तिचा गौरव करण्यात आला.तिने वक्तृत्व स्पर्धेसाठी आजच्या युवकापुढील आव्हाने आणि आदर्श हा विषय निवडला होता.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.आ.आप्पासाहेब राजळे,शेवगाव -पाथर्डीच्या कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे, सचिव रवींद्र महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजधर टेमकर ,कार्यालयीन अधिक्षक विक्रम राजळे, कला शाखाप्रमुख डॉ. एम. एस. तांबोळी,विज्ञान शाखाप्रमुख डॉ.जे.एन.नेहुल,वाणिज्य शाखाप्रमुख डॉ.एस.जे.देशमुख , ग्रंथालय प्रमुख डॉ. आर.पी.घुले, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
वक्तृत्व, वादविवाद व कला सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख.डॉ.सुभाष भगवान देशमुख,मराठी विभाग प्रमुख डॉ.जालिंदर कानडे, डॉ.चंद्रकांत काळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें