आनंद महाविद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल घोषित

आनंद महाविद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल घोषित

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण: 

शहरातील श्री आनंद महाविद्यालयात घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा सांघीक करंडक न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहिल्यानगरचा आकाश मोहिते व महेश उशीर यांनी पटकाविला वैयक्तिक स्पर्धेतील प्रथम क्रमांक दादापाटील राजळे महाविद्यालय आदिनाथनगरची सिद्धी बाफना,द्वितीय क्रमांक न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजचा आकाश मोहिते तर तृतीय क्रमांक यशवंत महाविद्यालय नांदेडचा वेंकटराव शिंदे आणि उत्तेजनार्थ संगमनेर येथील ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेजचा आकाश बोडखे याने पटकावला.

श्री आनंद महाविद्यालयात महाविद्यालयीन स्तरावरील वकृत्व स्पर्धा मंगळवार (दि.४) रोजी पार पडली.स्पर्धेसाठी नांदेड,औरंगाबाद,अहिल्यानगर आदि जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते.स्पर्धेसाठी कै.डॉ. सुजाता गुगळे यांचे स्मरणार्थ विश्वजित गुगळे यांचे कडून आनंद करंडक रोख बक्षिसे व ट्रॉफी देण्यात आल्या.स्पर्धेचे उद्घाटन ग्रंथपाल डॉ. अशोक वैद्य यांचे हस्ते संपन्न झाले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शेषराव पवार होते.

या वेळी डॉ. जगन्नाथ बर्शिले,डॉ. मुक्तार शेख,डॉ. भाऊसाहेब घोरपडे,डॉ. बथूवेल पगारे उपस्थित होते.बक्षीस वितरण समारंभ प्राचार्य डॉ शेषराव पवार यांचे हस्ते संपन्न झाला.

स्पर्धेसाठी भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव,मराठी भाषा अभिजात झाली,पण जागेल काय?,आजच्या युवकांपुढील आव्हाने आणि आदर्श व पाणी टंचाई काल,आज आणि उद्या हे विषय ठेवण्यात आले होते.

स्पर्धेसाठी संदीप राठोड व सचिन चव्हाण यांनी काम पाहिले.प्रास्ताविक प्रा. अमोल महाजन,सुत्रसंचलन प्रा. मनीषा सानप तर आभार प्रा. सुर्यकांत काळोखे यांनी मानले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा. जगदीश बुधवंत,प्रा.विजयकुमार जगदाळे,प्रा. एकनाथ बोरुडे,प्रा. उद्धव घाटूळ यांनी परिश्रम घेतले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें