प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर मिरीत स्वेच्छेने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर मिरीत स्वेच्छेने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

मिरी: पांढरीपुल–शेवगाव रस्त्यावरील अतिक्रमणांवर ६ मार्च रोजी कडक कारवाई होणार असल्याचे जाहीर होताच अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या स्पष्ट आदेशानंतर संभाव्य कारवाईच्या भीतीने अनेक नागरिक स्वतःची अनधिकृत बांधकामे काढत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने या रस्त्याच्या कडेचे अंतर मोजण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याने अतिक्रमण धारकांनी सीमा रेषेचा विचार करून आपले नियमबाह्य अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानुसार, पांढरीपुल–शेवगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १५ मीटरपर्यंतचा भाग अतिक्रमणमुक्त केला जाणार आहे. महसूल, पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे ६ मार्च रोजी ही कारवाई केली जाणार आहे. त्याआधी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अनधिकृत बांधकामे हटवावीत, अन्यथा प्रशासनाच्या वतीने ती काढून टाकण्यात येतील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे.

जेव्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही कारवाई होते, तेव्हा अनेकदा संबंधितांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अनेकांनी प्रशासनाच्या आदेशाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

प्रशासनाच्या आदेशानंतर सुरू झालेल्या या हालचालींमुळे संपूर्ण पांढरीपुल–शेवगाव मार्ग येत्या ६ मार्च पर्यंत अतिक्रमणमुक्त होईल, असे संकेत मिळत आहेत.परंतु सदरची कारवाई झाल्यानंतर पुन्हा हे अतिक्रमण होणार नाही याची देखील प्रशासनाने दक्षता घेण्याचीगरज आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें