सेवापुर्ती निमित्त शाखा अधिकारी श्रीराम आव्हाड यांचा मिरी सोसायटीच्या वतीने सत्कार
मिरी (ता. पाथर्डी) – अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या मिरी शाखेचे शाखा अधिकारी श्रीराम आव्हाड यांच्या सेवानिवृत्ती निमित्त मिरी सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. २० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी क्लार्कपासून शाखा अधिकारी पदापर्यंतचा प्रवास करत उत्कृष्ट सेवा दिली.
यावेळी सोसायटीचे चेअरमन विजय जाधव, माजी चेअरमन आसाराम भगत, सुभाष गवळी, सचिव सुनील मुळे, रमेश गवळी, विठ्ठल गवळी, बाळू खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्रीराम आव्हाड यांनी आपल्या अनुभवांच्या आठवणींना उजाळा देत सहकारी बँकेबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास ग्रामीण भागाचा विकास अधिक वेगाने होईल, असे मत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.