विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ- विस्ताराधिकारी सुनिता पवार

विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ- विस्ताराधिकारी सुनिता पवार

आल्हणवाडी जिल्हा परिषद शाळेत विज्ञान व साहित्य प्रदर्शन

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे, विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन शिक्षण विस्ताराधिकारी सुनिता पवार यांनी केले.
आल्हणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसऱ्या विज्ञान व साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. सरस्वतीच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख रामदास लांघी, पत्रकार राजेंद्र चव्हाण तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गव्हाणे, सरपंच परमेश्वर गव्हाणे, उपसरपंच मनिषाताई कर्डिले, राधाकिसन कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे पत्रकार राजेंद्र चव्हाण म्हणाले की, विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असून विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होतील आणि म्हणून विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा उपयोग करून राज्य व देश पातळीवर आल्हणवाडी गावाचे, पाथर्डी तालुक्याचे नाव उंचवावे. आल्हणवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अरविंद चव्हाण यांनी प्रास्ताविकात शासनाचा प्रदर्शन भरविण्याचा उद्देश स्पष्ट केला. तसेच त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
सरपंच गव्हाणे, उपसरपंच कर्डिले, केंद्रप्रमुख रामदास लांघी यांची हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनामध्ये पहिली दुसरीचा एक गट व तिसरी चौथीचा दुसरा गट अशा दोन गटामधून अनेक उपकरणाची मांडणी करण्यात आली होती. दिवसभर आल्हणवाडी येथील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन बघण्यासाठी रांगा लावल्या होत्या. परीक्षकांनी विज्ञान प्रदर्शनातील उपकरणे (मॉडेल्स) व साहित्यांचे परीक्षण करून लहान गटात चार व मोठ्या गटांमध्ये चार असे गुणानुक्रम काढण्यात आले व शेवटी त्यांना प्रशस्तीपत्रक आणि रोख स्वरूपात बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्यावतीने भोजन देण्यात आले.

कार्यक्रमास मिनीनाथ देवकर, महेश वाघमोडे, नितीन जाधव, निरुपमा काकडे, शिक्षक नेते श्री लवांडे, आश्रम शाळेचे काळू जाधव, श्रीमती तोरणे मॅडम, न्यू इंग्लिश स्कूलचे बाळू फुंदे तसेच आश्रम शाळा, न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक जि. प. शाळेतील शिक्षक अरविंद चव्हाण यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका श्रीम. व्ही. एस. पंडित यांनी मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें