श्री वामनभाऊ विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
प्रतिनिधि – सोमराज बडे
पाथर्डी तालुक्यातील एकलव्य शिक्षण संस्थेचे श्री वामनभाऊ विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ (ता.२५)रोजी उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती पाथर्डी केंद्रप्रमुख उद्धव बडे हे विराजमान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शुभम खेडकर, पत्रकार सोमराज बडे हे उपस्थित होते. तर डॉ.राजेंद्र खेडकर,ग्रा.प.सदस्य आनंद रंधवे,गणेश बडे,रामदास बडे, हे या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमांची सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने सुरुवात झाली या प्रसंगी स्वागतगीत विद्यालयाच्या विद्यार्थीनीं यांनी सादर केले, या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी वर्षभराचा लेखा-जोखा प्रास्ताविकेतून प्रकट केला सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,क्रिडा स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा,वादविवाद स्पर्धा,सुदंर हस्ताक्षर स्पर्धा,विविध कला स्पर्धा,पार पडल्या होत्या,ह्या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले होते अश्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी बक्षिस समारंभाचे आयोजन केले होते. तर इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्याचा देखील गौरव या प्रसंगीं करण्यात आला
“विद्यार्थी आपले दैवत असून तो केंद्रबिंदू ठेऊनच आपण त्याचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे” असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धव बडे यांनी केले.या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रति असलेली महत्वकांक्षा व येथील सर्वच शिक्षकांची तळमळ दिसून येते आहे.विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत असे मत देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.खेडकर यांनी बोलतांना सांगितले की शिक्षण घेतांना कधी अपयश आले तर खचून न जाता अधिक सचोटीने त्यावर मात करून यशस्वी होता येते. आपले ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यत प्रयत्न करत राहावे. तर बडे यांनी सांगितले की मानवी जीवन नेहमीच स्पर्धात्मक असते .त्यामुळे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या युगात नेहमीच हार जित चा विचार न करता उतरले पाहिजे.जरी अपयश आले तरी पुढच्या वेळी अधिक मोठे यश मिळते.वामनभाऊ विद्यालयातील शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात.
यावेळी रामदास बडे,गणेश बडे,एकनाथ सारूक,मीरा बडे,वैशाली आघाव,संजय बारगजे,विठ्ठल खाडे, भगवान केदार,आदी उपस्तीत होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक कैलास नरोडे,घुले,,ढाकणे,गर्जे,अकोलकर,कुदळ, मर्दाने, यांनी प्रयत्न केले .सूत्रसंचालन दहिफळे यांनी तर आभार सनी मर्दाने यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व यशस्वी विद्यार्थांचे कौतुक याप्रसंगी मान्यवरांनी केले आहे.