सर्वसामान्य जनतेच्या विश्वासानेच तिसऱ्यांदा लोकांची सेवा करण्याचे भाग्य लाभले – आमदार मोनिकाताई राजळे
(पाथर्डी प्रतिनिधी सुयोग कोळेकर)
सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाने तिसऱ्यांदा लोकांची सेवा करण्याचे भाग्य लाभले, यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी तन मन धनाने काम केले, त्यामुळे शेवगांव पाथर्डी मतदारसंघात तिसऱ्यांदा हॅट्रीक करता आली. कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाल्याने अनेक कार्यकर्त्यांनी पेढे तुला कार्यक्रमाचे आयोजन केले, यातुन त्यांचा विश्वास व प्रेम दिसते, या कार्यकर्त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचे काम मला करावयाचे आहे. सन 2014 मध्ये निवडणुन आल्यानंतर मतदारसंघाचा सर्वांगीन विकासाचे ध्येय समोर ठेऊन काम करत आहे, त्याचीच पोहच पावती म्हणुन जनतेने मला तिसऱ्यांदा निवडुन दिले असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.
नागलवाडी येथील श्री क्षेत्र काशि केदारेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधनु सामाजिक कार्यकर्ते केशव आंधळे यांनी पेढेतुला कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील महंत बाबागिरी महाराज होते, यावेळी धनंजय बडे, शुभम गाडे, केशव आंधळे, राजेंद्र डमाळे, गंगाभाऊ खेडकर, संजय खेडकर, भिमराज सागडे, संदीप खरड, सुरेशराव नेमाणे, गणेश रांधवणे, आंबादास आंधळे, शिवाजीराव भिसे, चंद्रकांत गरड, ह.भ.प. चंद्रशेखर महाराज मुरदारे, सुरेश बडे, कासम शेख, अशोकराव खिळे, नारायण मडके, गोकुळ घनवट सर, भाऊसाहेब मुरकुटे, एकनाथ खोसे, विष्णु खोट, धनंजय आंधळे, अनिकेत आंधळे विष्णु आंधळे, सतीष आंधळे, आंबादास ढाकणे, किसन राठोड, लहु वडते, राहीबाई खुडे, रावसाहेब आंधळे तसेच भक्तगण, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या काशी केदारेश्वर येथील महादेव मंदिर हे उर्जास्थान असुन ऋषी काशिनाथबाबा यांच्या वास्तव्याने ही पावन भुमी पवित्र झालेली असुन राजळे कुटुंबाचे श्रध्दास्थान आहे. स्व. आमदार राजीवजी राजळे येथे कायम दर्शनासाठी येत असत. देवस्थानाच्या विकासासाठी आपण कटिबध्द आहेत, विकास कामासाठी वन विभागाच्या जमीनीची येणारी आडचण शासन पातळीवरून दूर करण्याचे काम करून येथे येणाऱ्या भाविकांना सुख सुविधा उपलब्ध करून देणेकरिता आपण बांधील असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.