स्पर्धा परीक्षेचे बाळकडू शाळेतुनच प्राप्त होते- महसूल सहायक आकांक्षा शेटे

स्पर्धा परीक्षेचे बाळकडू शाळेतुनच प्राप्त होते- महसूल सहायक आकांक्षा शेटे

चार माजी विद्यार्थ्यांची विविध शासकीय सेवेत निवड

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:

शहरातील श्री विवेकानंद विद्यामंदिर या शाळेत विविध शालाबाह्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे बाळकडू शालेय वयातच सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त होते, असे उद्गार नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत महसूल सहायकपदी निवड झालेल्या आकांक्षा दिपक शेटे यांनी व्यक्त केले.

पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या शाळेतील चार माजी विद्यार्थ्यांची विविध शासकीय सेवेत निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला.यामध्ये अक्षय कल्याण खेडकर -अन्नसुरक्षा अधिकारी, शुभम संजय आंधळे- महसूल सहाय्यक, आकांक्षा दिपक शेटे- महसूल सहाय्यक, गणेश सुनिल जरे – मुंबई कारागृह पोलीस अशा विविध शासकीय सेवेत निवड झाली आहे.

सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड होते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय वयातच ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.आई-वडील आपल्यासाठी जे कष्ट घेतात त्याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवली की नक्कीच यश मिळते. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी इंटरमिजिएट व एलिमेंट्री चित्रकला शासकीय ग्रेड परीक्षेत अ ग्रेड प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

सत्कार कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, मुख्याध्यापक शरद मेढे,संपत घारे, दीपक शेटे, संजीवनी आंधळे, अर्चना दराडे, अभिजीत सरोदे,सतीश डोळे, विठ्ठल धस, संदीप धायतडक, दीपक राठोड,सोनिका वखरे, तुषार शिंदे स्नेहल बोराडे, जनार्दन दराडे, निखिल देशमुख, राधा आव्हाड तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी गणेश जरे , शुभम आंधळे, अक्षय खेडकर यांनी मनोगत व्यक्त करून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळेच यश प्राप्त झाले आहे. शाळेतील असणारी गुणवत्ता, शिस्त-संस्कार,भौतिक सुविधा या सर्व गोष्टींचा आम्ही अंगीकार केला म्हणूनच यश प्राप्त झाले आहे, असे यावेळी सांगितले. यावेळी पालक श्रीमती संजीवनी आंधळे यांनी संस्थेने व शाळेने केलेल्या सहकार्याबद्दल भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी केले तर आभार शरद मेढे यांनी मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें