बाबुजी आव्हाड महाविद्यालयामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली

बाबुजी आव्हाड महाविद्यालयामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली

पाथर्डी (सुयोग कोळेकर): येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने जम्मू-काश्मीर राज्यातील पुलवामा जिल्ह्यामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय राखीव बलातील ताफ्यावर अतिरेक्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सूमारे ४० जवान शहीद झाले होते . त्यांचा देशाप्रती असलेला त्याग, निष्ठा,प्रेम, या भावनेतून झालेल्या बलिदानाची एक आठवण म्हणून बाबुजी आव्हाड महाविद्यालयांमध्ये शहीद जवानांना पुष्पहार व मेणबत्या लावून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी अमर रहे ,अमर रहे ,शहीद जवान अमर रहे , वीर जवानांचा विजय असो या सारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बबन चौरे,राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे, एनएसएस विभाग प्रमुख डॉ.अरुण राख, डॉ. किरण गुलदगड, डॉ. प्रशांत साळवे प्रा. दत्तप्रसाद पालवे प्रा.आनंद घोंगडे डॉ.अभिमन्यू ढोरमारे प्रा. ब्रम्हानंद दराडे व राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व छात्र उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें