अक्षय कर्डीलेंच्या जनता दरबारातून जनसामान्यांचे प्रश्न निकाल
अक्षय कर्डिलेंनी अधिकाऱ्यांना फोन करत आलेल्या व्यक्तींच्या समस्यांचे केले निरसन
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
राहुरी – नगर-पाथर्डी मतदारसंघाचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांना मणक्याचा त्रास जाणू लागल्यानंतर त्यांच्यावर लीलावती हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील किमान महिना पंधरा दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा देखील सल्ला दिला. त्यामुळे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आणि बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी जनता दरबाराच्या माध्यमातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या सर्वसामान्यांच्या अडी अडचणी समजावून घेत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना फोन करत मी अक्षय कर्डिले बोलतोय, म्हणत आलेल्या व्यक्तीच्या प्रश्नाची सोडवणूक केली. आपल्यावर पडलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व मोठ्या खुबीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जनता दरबाराच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आपुलकीने विचारपूस करत त्यांना आ. कर्डीले यांच्या अनुपस्थितीमध्ये सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा पुरेपूर प्रयत्न अक्षय कर्डिले यांनी या निमित्ताने केला.
दररोज मतदारसंघातील नियोजित कार्यक्रमाला देखील हजेरी लावून आमंत्रित केलेल्या संयोजकांना देखील समाधानी ठेवण्याचे काम अक्षय कर्डिले यांनी केले. दिवसभरात २५ ते ३० लग्नाला हजेरी एवढेच नव्हे, तर इतरही भेटीगाठीचे कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे हाताळून कर्डिले कुटुंबाच्याजवळ आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत ठेवण्याचा प्रयत्न युवा नेते अक्षय कर्डिले यांनी या निमित्ताने केला. अक्षय एकधाडसी आणि कणखर युवा चेहरा तरुणांना लाभला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील तरुणांची केलेली एकजूट अक्षय कर्डिले यांच्या कामी आली.