संत रविदास महाराजांचे तत्त्वज्ञान जीवनात अमूल्य संदेश देते-ह.भ.प.उद्धव महाराज चन्ने
श्री तिलोक जैन विद्यालयात संत रोहीदास महाराज जयंती साजरी
(पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण, सुयोग कोळेकर)
भारत भूमी ही वीरांची तसेच संतांची पवित्र भूमी आहे. अनेक प्रांतात अनेक संत होऊन गेले. त्यापैकीच एक संत रविदास महाराज होत. श्री तिलोक जैन विद्यालया मध्ये आज संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
रविदास महाराजांनी केलेल्या ४१ अर्थपूर्ण अभंगरचना गुरु ग्रंथसाहेब ग्रंथात समाविष्ट आहेत. मानवाला नामस्मरणातून ईश्वर चिंतनात विलीन होण्याचा कर्मयोग सांगणारे ते एक सर्वश्रेष्ठ संत होते, असे प्रतिपादन प्राचार्य अशोक दौंड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. ईश्वर भक्ती करतांना `मन चंगा तो कठोती मे गंगा ‘ या उक्तीप्रमाणे रविदास महाराजांचे तत्त्वज्ञान जीवन जगताना अमूल्य संदेश देते. सर्व मानवप्राणी ही एकाच ईश्वराची लेकरं आहेत. माणूस धर्माने नव्हे तर कर्माने ओळखला जातो. संत कबीराप्रमाणे सामाजिक समतेचे आणि सर्वधर्मसमभावाचे विचार प्रभावीपणे मांडलेले त्यांच्या अभंग रचनेतून दिसतात, असे प्रतिपादन ह. भ.प. उद्धव महाराज चन्ने यांनी याप्रसंगी उद्बोधन करतांना केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक संघटनेचे नेते आप्पासाहेब शिंदे, पर्यवेक्षक दिलावर फकीर, अजय भंडारी, भारत गाडेकर, डॉ. अनिल पानखडे, महेंद्र राजगुरू, उद्धव चन्ने, सुरेश मिसाळ, आत्माराम दहिफळे,अजय शिरसाठ, अशोक गर्जे, सुभाष भागवत, बापूसाहेब कल्हापुरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक आतिष भावसर यांनी व सूत्रसंचालन शाहीर भारत गाडेकर यांनी केले तर आभार बाळासाहेब गांगुर्डे यांनी मानले.