पाथर्डीत रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पाथर्डीत रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:

राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने पाथर्डी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थितीत सर्वांनी बुध्द वंदना व पंचशिल ग्रहण करुन अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी निवडुंगे गावातून अनेक माता- भगिणी आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला कामिनी शिंदे व प्राजक्ता शिंदे यांनी माता रमाईचे गीत गायन केले. या प्रसंगी मीनाताई शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुंदरमामा कांबळे यांनी प्रभावी विचार विषद केले.श्रीपद बळीद यांनी मातेचे उपकार सांगताना त्यांना गहिवरून आले. श्रीकांत काळोखे यांनी भूतकाळ व भविष्याचा वेध घेणारे मार्मिक विचार मांडले. एकनाथ ठोकळ यांनीही आपले विचार व्यक्त केले. जगदीश गाडे यांनी माता रमाई यांचा त्याग सांगितला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या सौ.गाडे यांनी माता रमाई यांचे कष्ट व त्यांनी बाबासाहेबांच्या यशामध्ये दिलेली मोलाची साथ आपल्या विचारातून व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी कैलास वेलदोडे, गणेश सरोदे, गौतम ढेकणे तसेच सुशिला चव्हाण, विमल चव्हाण, ललिता शिंदे, कमल शिंदे, सुरेखा शिंदे, लता शिंदे, रिता शिंदे, इंदुबाई साळवे, हिराबाई शिंदे, आसराबाई गायकवाड आदी निवडूंगे गावातील महिला- भगिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या शेवटी बिपिन खंडागळे यांनी आपल्या पहाडी आवाजात माता रमाई यांचे गीत गायन केले. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माता-भगिनीस जगदीश गाडे व सौ. गाडे यांच्या कडून साडी भेट म्हणून देण्यात आली. एकनाथ ठोकळ यांनी सर्व उपस्थितांना मिठाई देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र राजगुरू यांनी केले. सूत्रसंचालन हुमायून आतार यांनी केले तर सर्वांचे आभार जगदीश गाडे यांनी मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें