वांबोरी चारीची पाईप लाईन फुटल्याने मिरी परिसरातील तलाव कोरडेच

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या वांबोरी चारीचे पाणी मिरी येथील पाझर तलावात सोडण्यात आले मात्र पुर्ण दाबाने पाणी सोडण्यात न आल्याने प्रत्यक्षात मिरी भागातील शंकरवाडी तलावात वांबोरी चारीचे पाणी पुर्ण दाबाने आले नसल्याचे या भागातील लाभार्थी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पाथर्डी तालुक्याच्या दुष्काळी असलेल्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या वांबोरी चारीचे पाणी तालुक्यातील मिरी लाईनला सोडण्यात आले, महिनाभर पाणी चालु असुनही वांबोरी चारीचे पाणी मिरी भागातील तलावात अतिशय अल्प प्रमाणात पोहोचले आहे.

यावर्षी मिरी परिसरात पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच या भागात तिव्र पाणी टंचाई जाणवु लागली आहे. या भागातील तलावात वांबोरी चारीचे पुरेसे पाणी आल्यास पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.परंतु वांबोरी चारीचे पाणी नियमित पणे येत नसल्याने पाण्याअभावी गहू व हरबऱ्याची पिके वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांमधुन व्यक्त केली जात आहे.

या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने पुर्ण दाबाने व नियमित पाणी चालु ठेवण्यासाठी बारकाईने लक्ष द्यावे अशी मागणी ज्येष्ठ नेते राजुमामा तागड, महेंद्र सोलाट, मयुरतात्या तागड, राजु खरपुडे, संभाजी तोगे, मच्छिंद्र दारकुंडे, शैलेंद्र सोलाट, जगदीश सोलाट, शिवाजी तोगे, नामदेव जाधव, शिवाजी नवघरे, अशोक खरपुडे , संभाजी नवघरे, दत्तात्रय सोलाट, लहानु पुंडसह अनेक लाभार्थी शेतकर्यांनी केली आहे.
वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्यातील मिरी लाईनला चालु होते. परंतु वांबोरी येथील केएसबी कंपनीजवळ वांबोरी चारीची मुख्य वाहिनी फुटल्याने वांबोरी चारीचे पाणी बंद झाले आहे.या लाईनचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा पाणी सोडण्यात येईल-
सायली पाटील (कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग)