मिरीच्या जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली शैक्षणिक सहल आनंदात आणि उत्साहात पार पडली.
या सहलीत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन आनंद लुटला. या सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर, सुप्रसिद्ध भद्रा मारुती मंदिर,ऐतिहासिक देवगिरी किल्ला व जागतिक पातळीवर महत्त्व असलेले वेरूळ कैलास मंदिर व अप्रतिम शिल्पकला असलेल्या लेणी तसेच ताजमहल ची प्रतिकृती समजल्या जाणाऱ्या बिबी का मकबरा,वन्यजीव असलेले सिद्धार्थ गार्डन व प्रवरा संगम यांसह धार्मिक,नैसर्गिक व ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली.
या सहली दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रति विद्यार्थ्याचा विमा काढून संपूर्ण प्रवास शासकीय बसने करण्यात आला.सहलीदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली.
सहलीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी मुख्याध्यापक निलेश क्षिरसागर, आर.आर.निमसे,आर.पी.पालवे,एस.डी.साठे,पी.बी.ससाणे,एस.के.नरवडे,एच.एम.संचेती,एस.डी .पवार,एस.बी.पतंगे, एम.डी.दळ वी, आदी शिक्षकांनी विशेष जबाबदारी घेतली.
ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि आनंददायी ठरली. योग्य नियोजन व यशस्वी सहल केल्याबद्दल पालक वर्गातून देखील शिक्षकांचे कौतुक होत आहे.